शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

कापडे-कामथे रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: December 24, 2016 03:16 IST

तालुक्यातील कापडे-कामथे रस्त्याला खड्डे पडल्याने मोठी दुरवस्था झाली आहे. याबरोबरच तुर्भे, बोरजफाटा ते देवळे, करंजे, लहुलसे

पोलादपूर : तालुक्यातील कापडे-कामथे रस्त्याला खड्डे पडल्याने मोठी दुरवस्था झाली आहे. याबरोबरच तुर्भे, बोरजफाटा ते देवळे, करंजे, लहुलसे, पितळवाडी ते नानेघोल रस्ता, लोहारे खोंडा इत्यादी रस्त्यांची दुरवस्था झाली असून, या रस्त्यांनी वाहतूक करणे जिकरीचे झाले आहे. तालुक्याची जीवनवाहिनी म्हणून या रस्त्यांची ओळख आहे. या सर्व मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहनकडून एसटी सेवा सुरू आहे. माक्षत्र, हे रस्ते खराब झाल्याने एसटी सेवेवर त्याचा परिणाम झाला आहे. एसटी पंक्चर होण्याचे, तसेच पाटे तुटने अशा घटना वारंवार घडत असून, यामुळे पुढील फेऱ्यांवर परिणाम होऊन ग्रामीण विभागातील जाणाऱ्या गाड्या उशिरा धावतात. तर रस्ते खराब असल्याने खासगी वाहतूक व्यावसायिक एक तर गाडी या गावांना घेऊन जात नाहीत, गेलेच तर भाडे दुप्पट द्यावे लागते. याचा फटका सामान्य नागरिकांना बसत असून, नाहक भर्दंड सोसावा लागत आहे.तालुक्यातील उमरठ हे ऐतिहासिक गाव आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्र माने पुनित झालेली ही भूमी. या गावाला असंख्य इतिहासप्रेमी भेट देत असतात. गेली अनेक वर्षे हा रस्ता कार्यक्र मापुरता तात्पुरता दुरु स्त केला जात होता. मात्र, नुकताच हा रस्ता आमदार भरत गोगवले यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला आहे. स्थानिक जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळबे यांच्या सातत्याने केलेल्या मागणीला यश आले असून, हा रस्ता नरवीर पुण्यतिथी अगोदर मार्गी लागेल. तालुक्यात घागरकोंड धबधबा, मोरझोत, चंद्रगड, कांगोरीगड, देवळे शिवमंदिर, रामवरदायीन, वाकन काळकाई मंदिर, कुडपन आदी पर्यटनस्थळे आहेत. या स्थळांकडे जाणारे रस्ते सुस्थितीत ठेवल्यास पर्यटक मोठ्या संख्येने येऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तालुक्यातील बहुतेक रस्ते हे जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहेत. मात्र, निधीच्या कमतरतेमुळे या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.सध्या मुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना जाहीर केली आहे. सध्या या योजनेतून उमरठ व महालगूर रस्त्याला निधी उपलब्ध झाला आहे. लवकर या रस्त्याचे काम सुरू व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.