शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये तीन तास महामार्ग बंद; बाजारपेठेत पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:11 IST

संपूर्ण महाडमध्ये शुक्रवारी संध्याकाळपासून पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू होती.

दासगाव : महाड तालुक्याला शुक्रवारी संध्याकाळीपासून पावसाने झोडपण्यास सुरवात केली. मध्यरात्री काळ व सावित्री नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरासह गावांतही पुराचे पाणी घुसण्यास सुरवात झाली. शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या पावसाने पुन्हा सर्वत्र २६ जुलै २००५ मधील अतिवृष्टीची आठवण अनेकांना करून दिली. मध्यरात्री साधारण तीनच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने तीन तास वाहतूक ठप्प झाली होती.संपूर्ण महाडमध्ये शुक्रवारी संध्याकाळपासून पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू होती. सावित्री व काळ नदीने धोक्याची पातळी ओलांडून महाड शहरात पाणी घुसण्यास सुरवात झाली. त्याचप्रमाणे तालुक्यातील दासगाव, वहूर, केंबूर्ली, गांधारपाले तसेच खाडी पट्ट्यातील अनेक गावात पूरजन्य स्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसाने महाड शहरातील वस्ती तसेच बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली. सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने व्यापाºयांनी सुटकेचा निश्वास व्यक्त केला.नडगाव परिसरात वाहतुकीत अडथळा ; चालक हैराणमुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. नडगावजवळ शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास महामार्गावर दरड कोसळली. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी महामार्गावरील वाहतुकीला फटका बसला. तीन तास महामार्ग बंद होता. चौपदरीकरण करणाºया ठेकेदार कंपनीने पाच पोकलेन आणि तीन जेसीबीच्या साहाय्याने तीन तासांच्या प्रयत्नांनी महामार्ग मोकळा करीत वाहतूक सुरू केली. मात्र अजूनही या ठिकाणी दरडीचा धोका कायम आहे. गेल्या वर्षी याच महामार्गावर केंबुर्ली गाव हद्दीत दरड कोसळून पाच तास महामार्ग बंद होता.

टॅग्स :Rainपाऊस