शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

मुरुडमध्ये सफाई कामगारांचे काम बंद , दोन महिन्यापासून मिळाले नाही वेतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 03:40 IST

मुरुड नगरपरिषद हद्दीतील काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाºयांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन न दिल्याने व गाडी चालकांना गेल्या चार महिन्यांपासून ठेकेदार आशिष देसाई यांनी वेतन न दिल्याने सर्व सफाई कामगारांनी मुरुड-जंजिरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना निवेदन देऊन ठेकेदाराच्या विरोधात मुरुड-जंजिरा नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर बंद आंदोलन सुरू केले आहे.

आगरदांडा : मुरुड नगरपरिषद हद्दीतील काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाºयांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन न दिल्याने व गाडी चालकांना गेल्या चार महिन्यांपासून ठेकेदार आशिष देसाई यांनी वेतन न दिल्याने सर्व सफाई कामगारांनी मुरुड-जंजिरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना निवेदन देऊन ठेकेदाराच्या विरोधात मुरुड-जंजिरा नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर बंद आंदोलन सुरू केले आहे. परिणामी मुरुड शहरातील साफसफाई बंद झाल्याने स्वच्छता प्रश्न गंभीर बनू शकतो.मुरुड नगरपरिषद हद्दीतील स्वच्छतेचा ठेका गंगोत्री इको.टेक्नो.सव्ही.प्रा.लि. यांना दिला आहे. त्याच्याकडे ३६ कामगार स्वच्छतेचे काम करत असतात. गेले दोन महिने कर्मचारी वेतनाची मागणी करत आहेत. आजपर्यंत कर्मचाºयांना वेतन दिलेले नाही यामुळे कामगारांची आर्थिक कोंडी झाली आहे, आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ७६ वर्षांची आजी सफाई काम करीत आहे. त्या आजींना ही वेतन न दिल्याने आज काम बंद आंदोलन सहभागी व्हावे लागले. ही परिस्थिती पाहून नगरसेवक अविनाश दांडेकर यांनी या ठेकेदाराचा निषेध करून या काम बंद आंदोलनाला पाठिंबा दिला. सदरचे वेतन त्वरित मिळावे याकरिता कर्मचाºयांनी मुरुडच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील, उपनगराध्यक्षा नौसिन दरोगे व मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना लेखी स्वरु पात निवेदन दिले आहे. याप्रसंगी बांधकाम सभापती अशोक धुमाळ, ज्येष्ठ नगरसेवक अविनाश दांडेकर, पर्यटन व नियोजन समिती सभापती पांडुरंग आरेकर आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.स्वच्छतेबाबत दक्ष असणाºया मुरुड- जंजिरा नगरपरिषदेला शासनाकडून स्वच्छता अभियान अंतर्गत विशेष पुरस्कार प्राप्त झाला. मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे सफाई कामगारांना काम बंद करणे भाग पडले आहे. यामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. ठेकेदरावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. मुरुड नगरपरिषद संबंधित ठेकेदाराला दर महिना बिल अदा केले जाते याप्रकरणी मुरुड नगरपरिषदेचा दोष नसल्याचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनीही सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड