शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाला दिबांचे नाव: सत्ताधाऱ्यांविरोधात प्रकल्पग्रस्त ९५ गावातील नागरिक आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 19:45 IST

" देता की जाता", १३ जानेवारी रोजी दिबांच्या जन्मदिनी आंदोलन. 

मधुकर ठाकूर, उरण : औरंगाबाद, उस्मानाबाद आणि गोवा विमानतळाचेही नामांतर झाले.  मात्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी फक्त राजकारण करत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य सरकार करीत आहेत. केंद्र व राज्याच्या या कृती विरोधात सरकारला इशारा देण्यासाठी नवीमुंबई, पनवेल,उरण आदी सिडको प्रकल्पग्रस्त ९५ गावातील वारकरी,सांप्रदायिक मंडळ भजन, कीर्तन,प्रवचन करून जनजागृती करणार आहेत.

दिबांच्या जन्मदिनीच १३ जानेवारी रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशव्दारावरच करण्यात येणाऱ्या जनजागृतीमध्ये सत्ताधाऱ्यांना " देता की जाता " असा पाच हजारांहून अधिक दिबाप्रेमी सहभागी होऊन इशाराही देणार आहेत. येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकी आधीच नामकरणाचा निर्णय घेण्यात दिरंगाई केल्यास विमानतळाचे काम बंद करण्याचा इरादाही या जनजागृती आंदोलनातून स्पष्ट करण्यात येणार असल्याचे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील आणि खारघरचे माजी सरपंच विजय शिरढोणकर यांनी संयुक्तपणे माहिती देताना सांगितले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी केंद्र, राज्य सरकारने जाणीवपूर्वक दिरंगाई चालविली आहे.महा विकास आघाडीच्या नामकरणाचेश्रेय लाटण्यासाठी  सत्ताधाऱ्यांनी राजकीय स्वार्थापोटी नवीमुंबई विमानतळाला लोकनेते दिबांच्या नावाची घोषणा केली खरी.मात्र केंद्र सरकारकडे नामकरणाचा प्रस्ताव पाठविण्यासाठी टाळाटाळ सुरू केली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर विमानतळाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत नाव देता येत नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मग सरकारने दिबांच्या नावाची घोषणा या आधीच कशी केली आहे.तसेच दिबांच्या नावासाठी विमानतळ होण्यापूर्वीच आंदोलन कशासाठी करण्यात आली होती. अशी विचारणा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील आणि खारघरचे माजी सरपंच विजय शिरढोणकर यांनी केली आहे.एकीकडे औरंगाबादचे संभाजीनगर, धाराशिवचे उस्मानाबाद असे नामांतर झाले आहे.तर गोवा विमानतळाला माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे.मात्र विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी चालढकल का केला जात आहे.असा सवालही राजेंद्र पाटील, विजय शिरढोणकर यांनी केला आहे. केंद्र व राज्य सरकार जाणीवपूर्वक विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी चालढकल करीत आहे.

यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे १३ जानेवारी रोजी दिबांच्या जन्मदिनी  नवीमुंबई, पनवेल,उरण आदी सिडको प्रकल्पग्रस्त ९५ गावातील वारकरी,सांप्रदायिक मंडळ भजन, कीर्तन, प्रवचन करून  केंद्र,राज्य सरकारचा निषेध करुन जनजागृती करणार आहेत.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशव्दारावरच आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनामध्ये सुमारे पाच हजार दिबा प्रेमी नागरीक आणि अनुयायी सहभागी होणार आहेत.लोकसभा निवडणुकीपूर्वी विमानतळाला दिबांचे नाव देण्यात यावे.अन्यथा विमानतळाचे काम बंद पाडण्याचा निर्धारही प्रकल्पग्रस्तांच्या माध्यमातून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील आणि खारघरचे माजी सरपंच विजय शिरढोणकर यांनी व्यक्त केला आहे.दिबांच्या रक्तरंजीत झेंड्याखाली या जनजागृतीमध्ये सत्ताधाऱ्यांना " देता की जाता " असा इशाराही दिला जाणार आहे. 

सत्ताधाऱ्यांनी विमानतळाला दिबांचे नाव देण्याबाबत कोणताही ठोस निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलनाची दिशा याच आंदोलनात ठरविण्यात येणार आहे.यामुळे सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील आणि खारघरचे माजी सरपंच विजय शिरढोणकर यांनी केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई