शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उरण ओएनजीसी प्रकल्पाच्या वायुप्रदूषणाने नागरिक त्रस्त, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 20:33 IST

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पांमधुन मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर हवेत सोडण्यात येणाऱ्या वायुमुळे वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत.

मधुकर ठाकूर 

उरण : उरणच्या ओएनजीसी प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर हवेत सोडण्यात येणाऱ्या वायुमुळे वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या वाढत्या वायुप्रदूषणाचा परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असून त्याच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. त्रस्त झालेल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असताना मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याने मंडळाच्या गळथान कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. 

उरण परिसरातील जेएनपीए,ओएनजीसी, बीपीसीएल,उरण-पनवेल रस्त्यांवर २४ तास अखंडपणे धडधडणाऱ्या दगडखाणी,क्वाऱ्या व जेएनपीए अंतर्गत असलेल्या रासायनिक प्रकल्पांमुळे याआधीच जल,वायु प्रदुषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या वाढत्या प्रदूषणाचा विपरीत परिणाम नागरिकांच्या नव्हे तर पशुपक्षी आणि जीवजंतुंच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होत आहे.

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पांमधुन मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर हवेत सोडण्यात येणाऱ्या वायुमुळे वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. या वायुप्रदूषणामुळे नागरिकांना श्र्वसनाच्या आणि इतर व्याधींचा त्रास जाणवू लागला आहे.यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.याक वाढत्या वायुप्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचेही दुर्लक्षच होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.कायम अपयशी ठरत असलेले प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी वायुप्रदुषण नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षता घेतील अशी साधारण  अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.  

दिवस-रात्रीच्या सुमारास हवेतुन उग्रदर्पाचा वास येत आहे.यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये श्वसनाचे तसेच इतर शारीरिक व्याधी निर्माण होण्याची भीती एका डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मागील दीड वर्षाच्या कालावधीत उरण ओएनजीसीच्या विरोधात वायुप्रदूषणाबाबत नागरिकांकडून एकही तक्रार विभागाकडे प्राप्त झालेली नसल्याचा दावा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी सचिन आडकर यांनी माहिती देताना केला आहे.

नागरिकांच्या वाढत्या तक्रारींनंतर वायुप्रदूषणाबाबत ओएनजीसी प्रकल्पाच्या वरिष्ठांना नागाव ग्रामपंचायतीने सहा दिवसांपूर्वीच पत्र पाठवले असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी किरण केणी यांनी दिली.

प्रदुषणाबाबत विशेष दक्षता घेतली जात असल्याने उरणच्या ओएनजीसी प्रकल्पांमधुन  कोणत्याही प्रकारचे वायुप्रदूषण होत नाही.याबाबत अद्याप तरी तक्रार प्राप्त झाली नसल्याचा दावा उरण ओएनजीसी प्रकल्पाचे मुख्य अधिकारी सुभोजीत बोस यांनी माहिती देताना केला आहे.

टॅग्स :uran-acउरण