शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीबचतीसाठी प्रत्येक गावात नेमणार जलदूत, प्रशासकीय यंत्रणेबरोबरच नागरिकांचा पुढाकार आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 02:56 IST

पाणी हे जीवन असून अमूल्य आहे. पाणीबचतीचा संदेश सर्वदूर पोहचावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहिजे.

- जयंत धुळपअलिबाग : पाणी हे जीवन असून अमूल्य आहे. पाणीबचतीचा संदेश सर्वदूर पोहचावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहिजे. जलजागृती सप्ताहात पाण्याचे महत्त्व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक गावात जलदूत तयार करून जनजागृती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी केले आहे.महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत जिल्ह्यात १६ ते २२ मार्चदरम्यान जलसंपदा विभागाच्या माध्यमातून आयोजित जलजागृती सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. त्यावेळी डॉ.सूर्यवंशी बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी उत्तर कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे, रायगड जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.एन.साळुंखे, हेटवणे मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस.डी.गाढे, पर्यावरण समितीच्या सचिव संगीता जोशी, प्रा. हेमंत सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्हाधिकारी सूर्यवंशी म्हणाले, जगण्यासाठी जसा श्वास महत्त्वाचा तसेच पाणी महत्त्वाचे आहे. पाण्याचे यथायोग्य नियोजन करणे काळाची गरज आहे. प्रत्येकाने पाणीबचतीचा अवलंब करावा. या सप्ताहात जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात पथनाट्याद्वारेही जनजागृती करावी असे निर्देशही त्यांनी दिले.जिल्ह्यात पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून जलयुक्त शिवार योजनाही फलदायी ठरली आहे. पाण्याचा अपव्यय होणार नाही याकरिता सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी अखेरीस सांगितले.पर्यावरण समितीच्या सचिव संगीता जोशी व प्रा. हेमंत सामंत यांनी पाणीबचत व जलजागृती सप्ताहाचे महत्त्व विशद करून उपस्थितांना सांगितले. जिल्ह्यातील अंबा, कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा, उल्हास या नद्यांतील पाणी एकत्र करून जलकलशाचे पूजनही यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जलसाक्षरता अभियानाबाबत स्वामी कला मंच संस्थेच्या कलाकारांनी जलबचतीवर नाट्य सादर केले. तर उत्तर कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ ठाणे व पाटबंधारे मंडळ रायगड आणि सरिता कला मंच अहमदनगर यांनी जलजागृतीपर गीत सादर केले. जलप्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील विविध पाटबंधारे प्रकल्पांची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांनी प्रास्ताविकात सप्ताहादरम्यान राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली तर आभार हेटवणे मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस.डी.गाढे यांनी मानले.>जलव्यवस्थापनातून बचत शक्यपाणी हा विषय जीवनाशी निगडित असून त्याचा वापर करताना प्रत्येकाने काळजीपूर्वक केल्यास पाण्याची बचत होऊ शकते. जिल्ह्यातील नद्या, तलाव, पाझर, झरे आदी सर्व जलस्रोतांचे जलव्यवस्थापन शाश्वत पध्दतीने केल्यास पाण्याची बचत होऊन आपले जीवनमान उंचाविण्यासाठी त्याची मदत होईल, असे मत यावेळीउत्तर कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ यांनी व्यक्त केले.कोकणामध्ये पाऊस चांगल्याप्रकारे होत असल्यामुळे त्याचे जलव्यवस्थापन होणेही गरजेचे आहे. नागरिकांनी पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये भाजीपाल्याची लागवड करून उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावे,असेही त्यांनी अखेरीस सांगितले.