शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

सिडकोचे लक्ष आता नैना परिसरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 01:00 IST

नवीन वर्षात विकासकामांना सुरुवात : बेकायदा बांधकामांच्या विरोधात कसली कंबर

नवी मुंबई : तिसरी मुंबई म्हणून सिडकोच्या नैना क्षेत्राकडे पाहिले जाते. या क्षेत्रातील १७५ गांवाच्या विकास आराखड्यालाही मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्यातील २३ गावांच्या विकासाला नवीन वर्षापासून प्रत्यक्षात सुरूवात केली जाणार आहे. त्यामुळे सिडकोने आपले लक्ष आता नैना क्षेत्रावर केंद्रीत केले आहे. याचाच एक भाग म्हणून मागील काही दिवसांपासून या विभागातील अनधिकृत बांधाकामांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने संबधित विभागाने कंबर कसली आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील क्षेत्राचा नियोजनबध्द विकास व्हावा, यादृष्टीने शासनाने रायगड जिल्ह्यातील २५६ व ठाणे जिल्ह्यातील १४ अशा २७0 गावांचे सुमारे ५६0 किमी क्षेत्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित अर्थात नैना क्षेत्र म्हणून अधिसूचित केले आहे. या क्षेत्राच्या नियोजनबध्द विकासासाठी सिडकोची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र दरम्यानच्या काळात या क्षेत्रातील काही गावे नियोजनासाठी एमएसआरडीसीकडे वर्ग करण्यात आली. तर काही गावांचा समावेश पनवेल महापालिकेत करण्यात आला. त्यामुळे नैनाचे क्षेत्र २२४ गावांपुरते मर्यादीत राहिले आहे. यापैकी सिडकोने पहिल्या टप्यात पनवेल तालुक्यातील २३ गावांचा समावेश करून विकासाचा पायलट प्रोजेक्ट तयार केला. राज्य शासनाच्या संबधित विभागाने २७ एप्रिल २0१७ रोजी याच्या अंतरिम विकास आराखड्याला मंजुरी दिली. उर्वरित २0१ गावांच्या विकास आराखड्याला सुध्दा १६ सप्टेंबर २0१९ रोजी नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. असे असले तरी दुसऱ्या टप्यातील मूळ २0१ गावांतून ४९ गावे वगळण्यात आली आहेत. खालापूर तालुक्यातील ३५ आणि ठाणे तालुक्यातील १४ अशी वगळण्यात आलेल्या गावांची आकडेवारी आहे. त्यामुळे दुसºया टप्यात आता केवळ १५२ गावे शिल्लक राहिली आहे. पहिल्या टप्यातील २३ आणि दुसºया टप्यातील १५२ अशा एकूण १७५ गावांच्या विकासासाठी सिडकोने कंबर कसली आहे.

नैना क्षेत्राच्या विकासात अनधिकृत बांधकामांचा मोठा अडथळा निर्माण होणार आहे. गेल्या सहा वर्षात या परिसरात मोठ्याप्रमाणात बेकायदा बांधकामे उभारण्यात आली आहे. या बांधकामांना आळा घालण्यास सिडकोच्या संबधित विभागाला अपयश आले आहे. नैनाचे विस्तीर्ण क्षेत्र पाहता अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडे असलेले मनुष्यबळ आणि साधनसामग्री अत्यंत तोटकी असल्याने या विभागाला अपेक्षित प्रभाव टाकता आला नाही. असे असले तरी मागील वर्षापासून या विभागाला अतिरिक्त बळ देण्यात आले आहे. नैना क्षेत्रासाठी स्वतंत्र अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग तैनात करण्यात आला आहे. या विभागाने उपलब्ध साधनसामग्रीच्या बळावर नैना क्षेत्रातील बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.मोहीम तीव्र होणारबुधवारी नैना क्षेत्रातील .. गावातील एका चार मजली बेकायदा इमारतीवर कारवाई केली. त्यानंतर गुरूवारी पनवेल तालुक्यातील काळोखे, शिरढोण व चिंचवण या गावातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. नैना क्षेत्रातील बेकायदा बांधकामांच्या विरोधात येत्या काळात मोहिम अधिक तीव्र करण्याचा निर्णय संबधित विभागाने घेतला आहे.

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई