शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चिखली आरोग्य केंद्राच्या दुरवस्थेचा १० गावांना फटका, रुग्णवाहिकेसाठी जागा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 03:40 IST

अलिबाग तालुक्यातील चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा दिवसेंदिवस ढासळताना दिसत आहे.

अलिबाग - तालुक्यातील चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा दिवसेंदिवस ढासळताना दिसत आहे. मागील चार वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी खर्च करूनसुद्धा चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था जैसे थे आहे. आरोग्य केंद्राचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे येथे दहा गावांतील रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसत आहे. आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका आहे. मात्र, जागेअभावी आरोग्य केंद्रापासून आठ कि.मी. अंतरावर ठेवावी लागत असल्याने रुग्णांना तत्काळ सेवेसाठी रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होण्यास अडचण होत आहे.कुसुबळे, कुर्डुस, हेमनगर, काचळी, भोमोली, सांबरी, पिटकिरी, कातळपाडा, डभेवाडी, वाघवीरा या परिसरातील जवळपास हजारोच्या आसपास लोकसंख्या चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्य सेवेचा लाभ घेतात. या आरोग्य केंद्रामध्ये २४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुख्य आरोग्यकेंद्र हे तत्काळ सेवेसाठी २४ तास उपलब्ध असावे, असा नियम आहे; परंतु चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातून सायंकाळी ५ वाजल्यानंतर कोणत्याही प्रकारची सेवा मिळत नसल्याचे येथील नागरिकांची ओरड आहे. सध्या पावसाच्या कालावधीत सर्पदंश, विंचूदंश, महिलांच्या प्रसूती व लहान मुले यांच्यासाठी येथील नागरिकांना रु ग्णवाहिकेच्या अभावी खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे. या विभागात आदिवासी लोकसंख्या जास्त असल्याने त्यांना आर्थिक खर्च परवडणारा नाही. आदिवासीवाडी व भोमोली येथील डोंगराळ आदिवासी परिसरातून रात्री उशिरा रुग्णांना उपचारासाठी आरोग्यकेंद्रात आणल्यास ऐनवेळी आरोग्य केंद्र बंद असल्याने रु ग्णांची गैरसोय होते, असे कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रसिका केणी यांनी सांगितले.अधिकाऱ्यांनी जबाबदारी घ्यावीबांधकाम विभाग कधी काम पूर्ण करेल हे माहिती नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी थांबत नाहीत, असे उत्तर देऊन जिल्हा आरोग्य अधिकारी यांची जबाबदारी संपत नाही, ते जिल्ह्याचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी घेतलीच पाहिजे. अन्यथा सरकारी खुर्चींमध्ये नुसते बसून काय उपयोग, असा सवालही ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू आहे. त्यामुळे जवळच एका खोलीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज चालते, त्यामुळे कर्मचारी तेथे थांबत नाहीत. काम कधी पूर्ण होणार हे बांधकाम विभागाचे अधिकारी सांगू शकतात.- डॉ. सचिन देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारीढासळलेली आरोग्य यंत्रणा सुस्थितीत करण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. चार वर्षे होत आली तरी कामे पूर्ण होत नाहीत.- रसिका केणी, उपसरपंच,कुसुंबळे ग्रामपंचायतप्रशासनाकडेयाबाबत सातत्याने तक्रारी करण्यात येतात. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नाही. आरोग्यकेंद्र बांधणीचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत रु ग्णालयाची रु ग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

टॅग्स :Raigadरायगड