शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ बाजारात भाज्यांची स्वस्ताई; आवक वाढल्याने दर निम्म्याने घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 23:53 IST

सुधागड तालुक्यातील ग्राहक आनंदी

- विनोद भोईरपाली : रायगड जिल्ह्यात किरकोळ बाजारात गेले अनेक दिवस भाज्यांचे भाव गगनाला भिडले होते. मात्र, आता भाज्यांची आवक वाढल्याने भाज्यांचे दर निम्म्याने कमी झाले आहेत. यामुळे ग्राहकदेखील खूश झाले आहेत.काही दिवसांपूर्वी कोथिंबिरीची एक जुडी ४० ते ५० रुपयांना मिळत होती. ती आता अवघी १० रुपयांना मिळत आहे. तब्बल १२० रुपये किलोच्या पुढे गेलेली मटार आता ५० ते ६० रुपये किलोने मिळत आहे. जिल्ह्यातील किरकोळ व घाऊक भाजी विक्रेते पुणे मंडई किंवा वाशी बाजारातून भाजी विक्रीसाठी घेऊन येतात. कोरोना संकटात ट्रान्सपोर्टचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर हमाल व मजूरदेखील उपलब्ध होत नव्हते. यातच भाज्यांची आवकसुद्धा फारच कमी होती. बाजारात अनेक प्रकारच्या भाज्यादेखील उपलब्ध होत नव्हत्या. अशा विविध कारणांमुळे भाज्यांचे भाव वधारले होते. मात्र सध्या वाहतुकीची चांगली सोय, चांगले हवामान यामुळे शेतकऱ्यांच्या हाती भरघोस पीक आल्याने व माणसे उपलब्ध झाल्याने बाजारात भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे भाज्या स्वस्त झाल्या असल्याचे पालीतील भाजी विक्रेत्याने सांगितले. राजमा, जाडी मिरची या काही भाज्या तर मिळतदेखील नव्हत्या. मात्र आता सर्वच भाज्या उपलब्ध होत आहेत.

टॅग्स :vegetableभाज्या