नवी मुंबई : ऐरोली आणि बेलापूर विधानसभेची मतमोजणी आज वाशी येथे होणार आहे. त्याकरिता मतमोजणी केंद्रावर शनिवारपासूनच पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निकाल ऐकण्यासाठी जमणा:या कार्यकत्र्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
विधानसभेसाठीचे मतदान बुधवारी संपूर्ण राज्यात पार पडली. रविवारी याची मतमोजणी होणार आहे. त्यानुसार बेलापूर आणि ऐरोली या दोन मतदार संघाची मतमोजणी वाशी सेक्टर 4 येथील सिक्रेट हार्ट शाळेमध्ये होणार आहे. त्याकरीता शनिवारपासूनच या शाळेला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. परिमंडळ 1 मध्ये होत असलेल्या या मतमोजणीसाठी 3क्क् हून अधिक पोलिस कर्मचा-यांसह वरिष्ठ अधिकारीही बंदोबस्तावर कार्यरत राहणार आहेत. तर मतमोजणी केंद्राच्या संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवता यावे याचीही पोलिसांनी दक्षता घेतली असून टेहळणी मनोरा तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे संपूर्ण परिसरातील हालचालींवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. मतमोजणी केंद्रामध्ये दोनही विधानसभा क्षेत्रचे सर्व उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्याव्यतीरीक्त निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असलेल्या व्यक्तीलाच आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. निकालाची उत्सुकता असलेले राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने मतमोजणी केंद्रावर जमणार आहेत.
यंदा प्रथमच सर्वच पक्ष स्वतंत्र लढत असल्याने कार्यकत्र्याची गर्दी वाढण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मतमोजणी केंद्रासमोरच असलेल्या मैदानात कार्यकत्र्याना थांबण्याची सोय करण्यात आली आहे. तेथे लाउडस्पिकरवरून वेळोवेळी निकालांची घोषणा केली जाणार आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकत्र्यामध्ये निकालानंतर वाद निर्माण होऊ नये याचीही पुरेशी खबरदारी घेतली असल्याचे एका पोलीस अधिका-याने सांगितले. (प्रतिनिधी)
मतमोजणी केंद्रावर कोणताही गैर प्रकार होऊ नये यासाठी सुमारे 3क्क् पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर तैनात करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या ओळखपत्रशिवाय कोणालाही आत प्रवेश दिला जाणार नाही. तर कार्यकत्र्यासाठी मैदानामध्ये निकाल ऐकण्याची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे.
- शहाजी उमाप, पोलीस उपायुक्त, परिमंडळ -1
वाहतुकीच्या मार्गात बदल
मतमोजणीच्या अनुषंघाने सिक्रेट हार्ट शाळेसमोरील रस्त्यावर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार वाशी पोलीस ठाने ते एनबीएसए टेनिस मैदानार्पयतचा रस्ता सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेर्पयत बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी केले आहे.