श्रीवर्धन : गोपाळकाला हा उत्सव साजरा करताना उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार १८ वर्षांखालील बालकांना गोविंदा पथकात मनोरे रचण्यापासून दूर करून अपघात व अनुचित प्रकार घडू नये याची प्रत्येकाने जबाबदारी घेणे आवश्यक आहे. येणारा गणपती उत्सव साजरा करताना लाऊडस्पीकर व डीजे साउंड याचा ध्वनी नियंत्रित करून सण साजरे करावे, जेणेकरून हा आवाज वाढवल्याने यांचा त्रास वयोवृद्धांना अथवा छोट्या बालकांना होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याप्रमाणे बकरी ईद सणसुद्धा हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने साजरे करावा, अशी सूचना दिघी सागरी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी केली.तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्यात शांतता समितीची सभा आयोजित केली होती. या वेळी मोगले बोलत होते. (वार्ताहर)सदस्यांची उपस्थितीश्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्यात शांतता समितीची सभा आयोजित केली होती. विभागातील प्रत्येक गावागावातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उपनिरीक्षक प्रभाकर खोत, जि.प. सदस्य श्यामकांत भोकरे, महंमद मेमन, सरपंच गणेश पाटील, लीलाधार खोत, उदय बापट, रमेश घरत, श्रीपाल कवाडे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सण गुण्यागोविंदाने साजरे करावे
By admin | Updated: August 19, 2016 01:33 IST