शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

खारघर शहरासाठी हवा पूर्णवेळ सिडको प्रशासक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 04:51 IST

नागरिकांची होत आहे गैरसोय: नागरी सुविधांवर होत आहे परिणाम

पनवेल : खारघर शहराला सिडकोच्या माध्यमातून पूर्णवेळ प्रशासकाची गरज आहे. ४0 सेक्टरमध्ये व्याप्ती असलेल्या या नोडमध्ये पूर्णवेळ प्रशासकांची नितांत आवश्यकता आहे. नुकतेचरुजू झालेले खारघर नोडचे प्रशासक रमेश गिरी हे इतर नोडच्या जबाबदारीमुळे खारघर सिडकोच्या कार्यालयात उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

सिडकोच्या माध्यमातून ड्रीम प्रोजेक्ट म्हणून खारघर शहराची ओळख आहे. गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क आदींसह विविध प्रकल्प सध्याच्या घडीला खारघर शहरात सुरू आहे. यासह तीन लाखांची व्याप्ती असलेल्या खारघर शहरात पाणी, कचरा आदींसह विविध प्राथमिक सुविधांचा अभाव पाहावयास मिळत आहे. अशा परिस्थितीत शहरातील नागरिक सिडकोचे जबाबदार अधिकारी म्हणून प्रशासकाची भेट घेत असतात. मात्र खारघर शहरातील प्रशासक जागेवर उपलब्ध नसल्याने शहरातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.खारघर सिडकोचे नवनियुक्त प्रशासक रमेश गिरी यांची आॅक्टोबर महिन्यात खारघर शहराच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर उलवा, द्रोणागिरी या सिडकोच्या दोन नोडची देखील जबाबदारी असल्याने त्यांना खारघर शहराकरिता वेळ देता येत नाही. विशेष म्हणजे या दोन्ही नोडच्या तुलनेने खारघर शहराची व्याप्ती मोठी आहे.शहरात विविध समस्या, अडचणी उद्भवल्या तर सामान्य नागरिक सिडको अधिकाऱ्यांची भेट घेत असतो. मात्र खारघर सिडकोच्या कार्यालयात प्रशासक उपलब्ध होत नसल्याने शहरातील समस्यासंदर्भात कोणाशी चर्चा करावी हा प्रश्न पडतो. शहराला पूर्णवेळ प्रशासकाची गरज आहे. सिडको अध्यक्षांकडे देखील ही मागणी आम्ही करणार आहोत. - दीपक शिंदे, नागरिक, खारघर शहररमेश गिरी यांच्यावर खारघरसह द्रोणागिरी, उलवे नोडची जबाबदारी असल्याने ते खारघर सिडको कार्यालयात पूर्णवेळ बसू शकत नाहीत. या तिन्ही नोडचे एकत्रित काम रायगड भवन ५ वा माळा येथून पाहणार आहेत.तशाप्रकारच्या नोटीस सर्व सिडको कार्यालयात त्वरित लावण्यात येतील.- प्रिया रातंबे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, सिडको 

टॅग्स :Raigadरायगडpanvelपनवेलcidcoसिडको