उरण : गणेशोत्सवामुळे उरण शहर व ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले आहेत. गणेशोत्सवानिमित्त उरण तालुका व शहरात कायदा आणि सुव्यवस्था रहावी तसेच या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बांधवांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बांधवांनी सुरक्षेचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. पोलीस बंदोबस्तामध्येही वाढ करण्यात आली आहे.सप्टेंबर, आॅक्टोबर या दोन महिन्यात गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी आदी सण उरणचे नागरिक खूप मोठ्या उत्साहाने साजरे करतात. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीमुळे उरणमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळते. त्यामुळे अनेक समाजकंटक या गर्दीचा फायदा घेतात. त्यामुळे मंगळसूत्र दागिने खेचणे, चोऱ्या अशा घटनेत वाढ होते. त्यातच वाढती लोकसंख्या व पोलिसांची कमी असलेले प्रमाण यामुळे पोलीस बांधवांनी आता तिसऱ्या डोळ्याची मदत घेतली आहे. त्यामुळे सुरक्षेला एक प्रकारे हातभार लागला आहे. (वार्ताहर)
महत्त्वाच्या रस्त्यांवर सीसीटीव्हीची नजर
By admin | Updated: September 19, 2015 23:58 IST