शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पर्ससीन नेटद्वारे मच्छीमारी करणाऱ्यांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 01:12 IST

६ सिलिंडर असणाऱ्या ३ नौकांना रात्रीच्या १२ च्या सुमारास गस्ती नौका मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र या अधिकाऱ्यांनी पकडून आगरदांडा जेटीवर आणून त्याच्यावर कारवाई करण्यात आली. 

आगरदांडा : मुरूड समुद्रकिनाऱ्यापासून ३५ किलोमीटर खोल समुद्रात रात्रीच्या वेळी एलईडी दिव्यांचा वापर करत पर्ससीन नेटच्या साह्याने मासेमारी करताना ६ सिलिंडर असणाऱ्या ३ नौकांना रात्रीच्या १२ च्या सुमारास गस्ती नौका मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र या अधिकाऱ्यांनी पकडून आगरदांडा जेटीवर आणून त्याच्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी प्रादेशिक उपायुक्त मत्स्य विभाग महेश देवरे, मत्स्य विभाग सहायक आयुक्त मुंबई संजय वाटेगावकर, मत्स्य विभाग अधिकारी मुंबई संजय माने, परवाना अधिकारी स्वप्नील दाबणे, परवाना अधिकारी तुषार वाळुंज, सुरक्षारक्षक केतन भगत, अलिबाग पोलीस मुख्यालय पोलीस शिपाई ओमकार सोंडकर, पोलीस शिपाई दामोदर खटले, पोलीस हवालदार योगेश हटकर, उपनिरीक्षक दत्तात्रय भोसले आदींसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत माशांचे साठेच नष्ट करणाऱ्या एलईडी पर्ससीन नेटवर मासेमारीवर मत्स्य विभागाने बंदी घालण्याचे आदेश देऊनही या आदेशांना केराची टोपली दाखवत रत्नागिरी या ठिकाणावरून जय भैरी आय एन.डी.- एम.एच.-४ एम.एम.-११८० ही ६ सिलिंडरची एलईडी नौका, धनदैलत आय.एन.डी. एम.एच.-४ एम.एम.-१०२४ ही ६ सिलिंडरची पर्ससीन नेट नौका, धनलक्ष्मी आय.एन.डी. एम.एच.-४ एम.एम.-१४८१ ही ६ सिलिंडरची नौका मुरूड समुद्रकिनारी येऊन एलईडी- पर्ससीन नेटच्या साह्याने मासेमारी करीत असताना अधिकाऱ्यांनी पकडले. मालकासह ३५ जणांवर कारवाई करून मुरूड तहसीलदार यांच्याकडे आणण्यात येणार आहे. या ३ नौकांमधून एलईडी दिवे, जनरेटर, बॅटरी व इतर वस्तू, ३०० किलो बारीक मच्छी या वस्तूचा पंचनामा करून ताब्यात घेतल्या. मत्स्य विभागाने आशा कारवाया सुरू ठेवल्यास अवैद्य मासेमारीला चाप बसेल, असे जयभवानी मच्छीमार सोसायटीचे चेअरमन महेंद्र गार्डी, प्रकाश सरपाटील, जगन वाघरे यांनी सांगितले.