शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कार्टुन चित्रांच्या छत्र्या, रेनकोट सरस; यंदा दरात पाच ते सहा टक्के वाढ!

By निखिल म्हात्रे | Updated: June 22, 2024 15:51 IST

यंदा २०० पासून ८०० रुपये किमतीच्या छत्र्यांची विक्री सुरू आहे. त्यांच्या दरात ५ ते ६ टक्के वाढ झाली आहे.

अलिबाग : बच्चे कंपनीचे कार्टूनचे वेड लक्षात घेऊन अनेक प्रकारच्या शैक्षणिक साहित्यावर त्याची छाप पडलेली दिसते. पण, रेनकोट आणि छत्र्याही याच प्रभावाखाली आहेत. विशेषत: बच्चे कंपनीच्या या वस्तूंवर कार्टून हमखास दिसत आहेत. यंदा २०० पासून ८०० रुपये किमतीच्या छत्र्यांची विक्री सुरू आहे. त्यांच्या दरात ५ ते ६ टक्के वाढ झाली आहे.

मागील आठवड्यापासून शाळेची पुस्तके, वह्या, दप्तर याबरोबरच छत्र्यांची खरेदी सुरू झाली आहे. लहान मुलांसाठी कार्टून प्रिंटची छत्री आणि रेनकोट उपलब्ध आहेत. या पावसाळ्यात लहान मुलांच्या रेनकोटमध्ये विविध कार्टून्सचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. यामध्ये डोरेमॉन, छोटा भीम, मोटू पतलू, स्पायडर मॅन, तर, लहान मुलींसाठी डोरा, बार्बी डॉल, सिंड्रेला यांचे छायाचित्र असलेले रेनकोट बाजारात आहेत.

अशाच नवीन ट्रेंडच्या छत्र्या, रेनकोटसाठी लहान मुले पालकांकडे आग्रह धरीत आहेत. दरवर्षी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन ट्रेंड आणला जातो. यंदाही तसा प्रयत्न झाला आहे. बाजारात पारंपरिक छत्रीसोबतच रेनबो छत्री, थ्रीडी आणि रंग बदलणारी छत्री नव्याने दाखल झाल्या असून सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

बाजारात नवे काय?नवनव्या फॅशनच्या छत्र्या बाजारात दाखल झाल्या आहेत. बाजारात सध्या रेनकोट, छत्र्या, पावसाळी टोप्या, ताडपत्री, प्लास्टिक पेपर आणि अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. छत्र्या २०० रुपयांपासून ते ८०० रुपयांपर्यंत मिळत आहेत. नामांकित कंपन्यांच्या चप्पल, शूज आहेत. अगदी १०० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत त्यांच्या किमती आहेत.

सध्या बाजारात छत्री, चप्पल आदी कार्टून्सच्या डिझानचे असल्याने त्याचा खप वाढला आहे. लहान मुलांना आवडणाऱ्या गोष्टी जाणून घेत आता छत्र्यांवर कार्टूनच्या डिझाईन काढण्यात आल्या आहेत. त्या मोठ्या प्रमाणावर विकल्या जात आहेत.- रितेश जैन, छत्री विक्रेता

शाळेत जाताना माझ्याकडे शाळेसाठी लागणारे साहित्य आकर्षक असायला हवे असा नेहमीच हट्ट असतो. आता मी सहावीमध्ये आहे. दरवर्षी विविध कार्टून्स असलेले चप्पल, स्कूल बॅग, कंपास, रेनकोट, छत्री घेतो. यावर्षी ही डोरोमाॅनची ‘थीम’ घेतली आहे.- पार्श्व कोर्लेकर, विद्यार्थी 

टॅग्स :alibaugअलिबाग