आॅनलाईन लोकमतघुग्घुस : घुग्घुस - चंद्रपूर रस्त्यावरील कबीर पेट्रोल पंपजवळ दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिली. यात दुचाकीवरील पती-पत्नी व तीन वर्षांची मुलगी जखमी झाली. सदर घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजता घडली. राजु खोब्रागडे, निर्मला खोब्रागडे अशी जखमींची नावे आहेत. यात त्यांच्या मुलीला काहीच झाले नाही, हे विशेष.राजु खोब्रागडे हे आपल्या दुचाकीने (क्र.एमएच ३४ एझेड १५१९) पत्नी व मुलासह घुग्घुसवरून चंद्रपूरला येत होते. दरम्यान, मागून भरधाव येणाºया कारने ( एमएच ३४ के ३८२२) दुचाकीला धडक दिली. त्यानंतर कारचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार पुढे उभ्या असलेल्या हायवा ट्रकमध्ये अडकली. यात राजू खोब्रागडे व निर्मला खोब्रागडे हे जखमी झाले. त्यांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी वाकदकर यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.
कारची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:48 IST
घुग्घुस - चंद्रपूर रस्त्यावरील कबीर पेट्रोल पंपजवळ दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिली.
कारची धडक
ठळक मुद्देमुलगी सुखरुप : पती-पत्नी जखमी