अलिबाग : सीरआरझेड क्षेत्रात गौणखनिज व भराव करण्यासाठी देण्यात आलेला परवाना तत्काळ रद्द करावा, माती माफियांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. परवाना रद्द न केल्यास संबंधित अधिकारी हे कांदळवनासह पर्यावरण अधिनियमाचे उल्लंघन करीत असल्याबाबत हरित लवादाकडे तक्र ार करण्यात येईल, असा इशाराही सावंत यांनी दिला आहे.ज्या खासगी कंपनीवर सीआरझेड क्षेत्रामधील कांदळवनांवर बेकायदा भराव करण्यासाठी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्याच कंपनीला त्याच क्षेत्रामध्ये मातीभराव करण्यासाठी मौजे झीराड येथून २५ हजार ब्रास माती उत्खननाची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ही परवानगी जारी करताना जिल्हाधिकारी कार्यालयामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात पर्यावरण भंगाचा गुन्हा दाखल असतानाही हा परवाना मंजूर करण्यास हरकत घेतली नसल्याबाबत सावंत यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सरकारला पर्यावरणाची काळजी आहे की महसुलाची असा प्रश्नही सावंत यांनी विचारला आहे. मातीचे व मुरुमाचे उत्खनन करावयाचे असल्यास संबंधित तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्या या पूर्वपरवानगीने व निसर्गाला कोणतीही हानी पोचणार नाही, अशा अटींवर परवानगी दिली जाते. तसेच त्याबदल्यात त्यांच्याकडून नियमानुसार महसूल आकारणीही केली जाते. मात्र, सध्या या माती माफियांचे जिल्ह्यात विशेषत: अलिबाग तालुक्यात पेव फुटले आहे. मातीच्या उत्खननाबाबतचे सर्व नियम धाब्यावर बसवून दिवसाढवळ्या अलिबाग तालुक्यात अवैध लाल मातीचे उत्खनन होत असल्याचे मत सावंत यांनी निवेदनात व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)९ लाख ६० हजारांची रक्कम सरकारी तिजोरीतविशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी सावंत यांना १ नोव्हेंबर २०१६ रोजी पत्र देवून मिळकतखार येथील या जागेमध्ये बेकायदा भराव केल्याप्रकरणी पोलिसांत एफआयआर दाखल असल्याने त्यांना तहसीलदारांनी भराव परवानगी नाकारली असल्याचे कळविले आहे. आता त्याच जागेत भराव करण्यासाठी मौजे झीराड येथून २५ हजार ब्रास मातीचा परवाना त्यापैकी २४०० ब्रास माती उत्खननासाठी ९ लाख ६० हजार रु पये इतकी रक्कम सरकारी खजिन्यात जमा करण्यात आली आहे. - मातीचे व मुरु माचे उत्खनन करावयाचे असल्यास संबंधित तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्या या पूर्वपरवानगी घ्यावी लागते.- उत्खननात निसर्गाला कोणतीही हानी पोचणार नाही, कोणतेही नुकसान होणार नाही अशा अटींवर उत्खननाची परवानगी दिली जाते.- अलिबाग तालुक्यातील मौजे मिळकत खार येथील ग.नं. ३९२/१, ग.नं. ४८५/१, ग.नं. ४८५/२, ग.नं. ४२१/१, ग.नं. ४२१/२ व ग.नं. ४२१/३ या सीआरझेड क्षेत्रामध्ये येणाऱ्या जमिनीमध्ये मातीचा भराव कोणतीही परवानगी न घेता केल्याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा. संचालक, नगररचना अलिबाग यांनी ही जागा सीआरझेड बाधित व कांदळवनयुक्त असल्याचा अहवाल २० डिसेंबर २०१७ रोजी संबंधित तहसीलदार यांना दिला आहे.
सीरआरझेड क्षेत्रातील भराव परवाना रद्द करा
By admin | Updated: April 13, 2017 02:53 IST