शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१६ कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी मोहीम; उरणमध्ये महावितरणने वसूल केले पाच कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 08:16 IST

ग्रामीण भागातील २७ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील स्ट्रीट लाइट, दिवाबत्तीपोटी साडेआठ कोटींची थकबाकी आहे. थकीत रकमेच्या वसुलीसाठी तीन वेळा नोटीस बजाविल्यानंतरही वीजबिलाची रक्कम भरण्यास ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ केली जात आहे.

उरण : उरण तालुक्यातील वाणिज्य, घरगुती आणि सार्वजनिक वीजबिलापोटी असलेल्या सुमारे १६ कोटींच्या थकीत रकमेपैकी मार्चपर्यंत सक्तीच्या वसुलीनंतरही फक्त पाच कोटी रुपयांची वसुली करण्यात उरण महावितरणला यश आले आहे. उरण तालुक्यामध्ये कोरोनाच्या काळातील महावितरण विभागाची विजेपोटी सुमारे १६ कोटींची वीजबिले थकीत आहेत. यामध्ये शहरी, ग्रामीण ग्रामपंचायतींच्या दिवाबत्तीची साडेआठ कोटी, घरगुती आणि इतर वीजबिलांपोटी साडेसहा कोटी आणि सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या वीजबिलांची ७० लाख अशी एकूण सुमारे १६ कोटींची  वीजबिले थकीत आहेत. वरिष्ठांच्या आदेशानंतर उरण महावितरणचे उपअभियंता हरिदास चोंडी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यात जोरदार थकीत बिले वसुली मोहीम हाती घेतली आहे. ग्रामीण भागातील २७ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील स्ट्रीट लाइट, दिवाबत्तीपोटी साडेआठ कोटींची थकबाकी आहे. थकीत रकमेच्या वसुलीसाठी तीन वेळा नोटीस बजाविल्यानंतरही वीजबिलाची रक्कम भरण्यास ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ केली जात आहे. यामुळे कारवाईचा बडगा उगारत ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यानंतर अनेक ग्रामपंचायतींनी जमेल तशी थकबाकीपैकी काही रक्कम जमा केली आहे.मात्र सक्तीच्या वसुलीनंतरही ग्रामपंचायतींकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे साडेसहा कोटींच्या थकीत रकमेपैकी फक्त सहा लाखच रुपये  जमा झाले आहेत. अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर टप्पाटप्प्याने बिले भरण्याची तयारी ग्रामपंचायतींनी दाखविली आहे. त्यानंतरच ग्रामपंचायतींचा खंडित वीजपुरवठा पुन्हा एकदा पूर्ववत केला आहे. 

कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याने निदर्शने- थकीत रक्कम वसूल करण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर  ग्राहक, ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक, हाणामारीचे प्रकार घडू लागले आहेत. काही ठिकाणी वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांनी पट्ट्याने मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. - त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आरोपींवर अटकेची कारवाई केली जात नाही तोपर्यंत कामकाज न करण्यासाठी उरण वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर निदर्शने केली. अखेर अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपींवर बुधवारी अटकेची कारवाई करण्यात आली. त्यानंतरच कर्मचाऱ्यांनी कामकाज सुरू केले.  

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज