शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

विदेशातून आले आणि लोकशाही उत्सवात सहभागी झाले

By निखिल म्हात्रे | Updated: May 7, 2024 16:51 IST

निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी सात जणांच्या विदेशी मंडळाने आज प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन निवडणूक प्रक्रिया जवळून अनुभवली.

अलिबाग - निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी सात जणांच्या विदेशी मंडळाने आज प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन निवडणूक प्रक्रिया जवळून अनुभवली. तसेच मतदान केंद्रात मतदानासाठी येणाऱ्या मतदारांनी भारतीय पद्धतीने नमस्कार करून गाईडच्या माध्यमातून त्यांनी संभाषण केले. पारंपारीक पध्दतीने केलेल्या स्वागतावर या विदेशी मंडळाने स्मित हास्य करीत सकात्मक पद्धतीने सुरु असलेल्या निवडणूक प्रक्रियेवर खुशाली दर्शविली.

विदेशी प्रतिनिधी मंडळातील महंमद मोनिरुझ्झमन टी, जी एम शाहताब उद्दीन, नुरलान अब्दिरोव, आयबक झीकन, सिलया हिलक्का पासिलीना, न्यायमूर्ती प्रिशीला चिगूम्बा आणि सिम्बराशे तोंगाई या सात जणांनी जिल्ह्यातील मतदान केंद्रावर जाऊन तेथील परीस्थितीचा आढावा घेतला. काही बाबी बारकाईने हेरून त्याच्या तशा नोंदी करून ठेवल्या आहेत. मतदानासाठी उत्साहाने आलेल्या मतदारांचा उत्साह त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपून ठेवला आहे.मतदान केंद्रावर मतदान करतेसमयी कोणाला भोवल अल्यास प्राथमिक उपचारासाठी कर्तव्यास असलेल्या आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्याशी हितगूज करीत त्यांच्याकडून सखोल माहीती घेतली. तर काही ठिकाणी तयार करण्यात आलेल्या सखी मतदान केंद्र, युवा मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र, दिव्यांग स्वयंचलीत मतदान केंद्रावर भेट देऊन मदान केंद्रावर उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. तर काही ठिकाणी आकर्षक बनविलेल्या सेल्फी पाॅईन्टवर फोटो काढीत लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाले होते.

विदेशी मंडळाचे पथक दोन दिवसापासून जिल्ह्यात दाखल झाले आहे. त्यांनी निवडणूक प्रक्रीया कशा पद्धतीने पार पाडली जाते हे पाहण्यासाठी रायगड लोकसभा मतदार संघ निवडला होता. त्यानुसार त्यानी दोन दिवस निवडणूकीचे प्रशासकीय कामकाज कस चालतय हे जवळून अनुभले.- किशन जावळे, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४alibaugअलिबागVotingमतदान