शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

केबल चालकांवर आसूड

By admin | Updated: September 29, 2015 01:25 IST

डिजिटलायझेशन अनिवार्य करण्यासाठी जिल्ह्यातील २१ बहुविध यंत्रणा परिचालकांवर (मल्टी सिस्टीम आॅपरेटर) सरकारने वेळेच्या बंधनाचा चाबूक उगारला आहे

आविष्कार देसाई , अलिबागडिजिटलायझेशन अनिवार्य करण्यासाठी जिल्ह्यातील २१ बहुविध यंत्रणा परिचालकांवर (मल्टी सिस्टीम आॅपरेटर) सरकारने वेळेच्या बंधनाचा चाबूक उगारला आहे. वेळेत काम पूर्ण केले नाही तर त्यांना प्रक्षेपणाचा मिळणारा सिग्नल बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आवडीच्या कार्यक्रमावर पाणी सोडावे लागू शकते. सेटटॉप बॉक्स उपलब्ध होत नसल्याचे कारण बहुविध यंत्रणा परिचालकांनी जिल्हा प्रशासनापुढे केले आहे. रायगड जिल्ह्यात २१ मल्टी सिस्टीम आॅपरेटर असून त्यांच्या खाली ५८९ केबल आयोजक आहेत. त्यांच्यामार्फत एकूण एक लाख २ हजार ९७८ केबल जोडण्या आहेत. पैकी ग्रामीण भागात ८७ हजार ११४ आणि शहरी भागात १५ हजार ८६४ केबल जोडण्या आले आहेत. ग्रामीण भागात ८३ हजार ७६४ तर शहरामध्ये ८७६ अशा एकूण ८४ हजार ६४० केबल जोडण्यांमध्ये सेटटॉप बॉक्स लागलेले नाही.नगर पालिकाक्षेत्रांमध्ये ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत सेटटॉप बॉक्स बसविणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागामध्ये ही मुदत ३१ डिसेंबर २०१६ अशी आहे. जिल्ह्यात एक लाख ८९ हजार ७१५ डीटीएच ग्राहक आहेत.पूर्वी करमणुकीची फारच कमी साधने अस्तित्वात होती. त्यामध्ये प्रामुख्याने गावच्या जत्रा आणि जत्रेमध्ये असणारे विविध खेळ, तमाशा, टुरिंग टॉकीजमधील सिनेमा यांचा त्यामध्ये समावेश होता. कालांतराने तंत्रज्ञानात प्रगती झाली. दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घरबसल्या मनोरंजनाचे साधन उपलब्ध करून दिले. त्यामध्येही सुरुवातीला एकच वाहिनी (चॅनल) दिसत होते. त्यानंतर डीडी मेट्रो हे चॅनल सुरू झाले. प्रेक्षकांना मनासारखे चॅनल पाहता येत नव्हते आणि न बघणाऱ्या चॅनलचा भुर्दंडही त्यांच्यावर पडत होता. त्यामुळे केंद्र सरकारने द केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेशन) अ‍ॅक्ट१९९५ हा कायदा आणला. या कायद्याच्या कलम ४ अन्वये दूरचित्रवाणीचे कार्यक्रम डिजिटल अ‍ॅड्रेसेबल सिस्टीमद्वारे प्रक्षेपित करावे लागणार आहेत. त्यासाठी सेटटॉप बॉक्स अनिवार्य करण्यात आला आहे.