अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका २७ मे रोजी पार पडणार आहेत. ६० ग्रामपंचायतींमधील ७५ जागांसाठी पोटनिवडणूक होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांनंतर पुन्हा एकदा ग्रामीण भागातील रणांगण या निमित्ताने तापणार आहे.राज्यातील जून ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रांमपंचायतींची सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीचा कार्यक्र म निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींमधील ७५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. ५ ते १२ मे २०१७ या कालावधीमध्ये सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना आपापले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. १५ मे रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. १७ मे रोजी उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दिली आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारांना चिन्हवाटपही करण्यात येणार आहे.२७ मे रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ६:३० या कालावधीमध्ये मतदान प्रक्रि या पार पडणार आहे. ३० मे रोजी मतमोजणी होणार आहे. अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे, सार्तिजे, मुरुड तालुक्यातील बोर्ली, आंबोली, तेलवडे, पेण तालुक्यातील कोपर या एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. पनवेल तालुक्यातील उमरोली, आपटा, वडघर, कर्जत तालुक्यातील आसल, हुमगाव, बीड बु., पाथरज, सावेळे, खालापूर तालुक्यातील वरोसे, वडवले, माणिकवली, माणगाव तालुक्यातील सणसवाडी, कडापे, हरकोल, नांदवी, टोळ खुर्द, करंबळा, लवेदाग, भागाड, डोंगरोली, फलाणी, तळा तालुक्यातील रोवळा, पडवण, रोहे तालुक्यातील ऐनवहाळ, भालगाव, आंबेवाडी, तांबडी, गोवे, तिसे यांचा समावेश आहे. महाड तालुक्यातील आदिस्ते, आंबेशिवथर, दादली, किंजळघर, घावरेकोंड, भावे, चिंभावे, किंजळोली बु., तेलंगे मोहल्ला, बिजघर, टोळ बु., भेलोशी, नरवण, पिंपळकोंड, मुमुर्शी, तेलंगे, शेल या ग्रामपंचायती आहेत. पोलादपूर तालुक्यातील तुर्भे बु., तुर्भे खोडा, तुर्भे खु., वझरवाडी, बोरावळे, तर म्हसळा तालुक्यातील खामगाव, कणघर, घुम या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
६० ग्रामपंचायतींच्या ७५ जागांसाठी पोटनिवडणूक
By admin | Updated: April 29, 2017 01:48 IST