शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

बस सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 02:51 IST

नेरळ शहराला अनेक गावे, पाडे जोडली गेली आहेत. याठिकाणी प्राथमिक शिक्षण घेतल्यावर विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च शिक्षण घेण्यासाठी नेरळ शहर गाठावे लागते.

कर्जत : नेरळ शहराला अनेक गावे, पाडे जोडली गेली आहेत. याठिकाणी प्राथमिक शिक्षण घेतल्यावर विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च शिक्षण घेण्यासाठी नेरळ शहर गाठावे लागते. नेरळ विद्या भवन या शाळेतील अनेक विद्यार्थी जवळपासच्या गावातून येतात. परंतु शाळेच्या वेळेत एस.टी. नसल्याने विद्यार्थ्यांना अधिक पैसे देऊन खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो. याची दखल महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांनी घेतली असून शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी एसटी सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुखकर झाला आहे.नेरळ शहरालगत धामोते गावात नेरळ विद्या भवन शाळा आहे. पाचवी ते दहावीपर्यंत असलेल्या या शाळेत परिसरातील सुमारे ३३० विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेत येणारे विद्यार्थी नेरळ शहरातील आजूबाजूची गावे, पाडे, आदिवासी वाड्यातून येतात.प्राथमिक शिक्षण जवळपासच्या जिल्हा परिषदेच्या शाळांतून पूर्ण केल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नेरळमध्ये शिक्षणासाठी यावे लागते. नेरळ विद्या भवन शाळेत येण्यासाठी पूर्वी पिंपळोली, वंजारपाडा आदी भागातून एस.टी. बस येत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत यायची उत्तम सोय होत होती. सुमारे १०० विद्यार्थी बसने शाळेसाठी प्रवास करायचे. मात्र खराब रस्ते, कमी प्रवासी आदी कारण देऊन प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी बस सेवा रद्द केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त पैसे खर्च करून खासगी वाहनाने शाळेपर्यंत यावे लागत होते.विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन नेरळ विद्या भवन शाळेचे परिवहन समिती अध्यक्ष दिनेश कालेकर यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे बससाठी पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार मार्च महिन्यामध्ये गुडवन ते नेरळ बसच्या मार्गाची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यावर नेरळ विद्या भवन शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी बस सेवा सुरू केली आहे. बससेवेचे उद्घाटन कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ व उपतालुका प्रमुख अंकुश दाभणे यांच्या हस्ते करण्यात आले. ही बस सकाळी ७ वाजता गुडवन येथून सुटणार आहे. त्यानंतर आंत्रट, काळ्याची वाडी, पिंपळोली, ताळवाडे खुर्द, तळवाडे बुद्रुक, वंजारपाडा, हंबरपाडा, दहिवली व धामोते शाळा अशा मार्गे विद्यार्थी घेत येणार आहे. बस सेवा सुरू झाल्याने गैरसोय टळल्याने विद्यार्थ्यांसह पालकवर्गही आनंदित आहेत. बस फेरीच्या उद्घाटन कार्यक्र मासाठी जमलेल्या मान्यवरांनी शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले तर याच कार्यक्र मात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके सुद्धा वाटप करण्यात आली.