शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भाऊचा धक्का-रेवस वाहतूकसेवा ८ सप्टेंबरपासून सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 03:38 IST

गणेशभक्तांना दिलासा : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे, वाहतूककोंडीपासून सुटका

जयंत धुळप 

अलिबाग : भाऊचा धक्का ते रेवस, अलिबाग दरम्यानची सागरी वाहतूक सेवा पावसाळ्यात सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली होती. ती येत्या ८ सप्टेंबरपासून पूर्ववत सुरू होत असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक व औद्योगिक सहकारी संस्थेचे सचिव वजीर बामणे यांनी दिली आहे. या सेवेमुळे गणेशभक्तांची मोठी सोय होणार असून त्यांचा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डेमय वाहतूककोंडीचा त्रास वाचणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागामार्फत महाराष्टÑ मेरीटाइम बोर्डाच्या (महाराष्टÑ सागरी मंडळ) प्रत्यक्ष नियंत्रण व देखरेखीखाली, भाऊचा धक्का ते रेवस (अलिबाग) हा जलमार्ग प्रवास ९० मिनिटांचा आहे. ८ सप्टेंबरपासून या जलमार्गावर सकाळी ६.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ही लाँच सेवा सुरू करण्यात येणार आहे. मुंबई-रेवस या मार्गावर दर महिन्याला २७ ते २८ हजार प्रवासी प्रवास करत असतात, असे बामणे यांनी सांगितले. समुद्रात टाकलेल्या प्लॅस्टिक पिशव्या लाँचखालील पंख्यामध्ये अडकल्याने अनेकदा लाँच बंद पडण्याच्या घटना घडल्या आहेत, परंतु आता प्लॅस्टिकबंदीमुळे अशा दुर्घटनांचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच लाँचमध्ये सुरक्षासाधने उपलब्ध आहेत किंवा नाहीत याची तपासणी १०ते १२ अधिकाऱ्यांकडून होते. दरवर्षी १७० ते १८० लाँचेसची तांत्रिक तपासणी केली जाते. त्यानंतरच लाँचला प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली जाते, असे त्यांनी सांगितले.पाच वर्षांत प्रवासी संख्येत २५ टक्क्यांनी वाढभाऊचा धक्का ते मोरा (उरण) ही लाँच सेवा सध्या दररोज सकाळी ६.३० ते सायंकाळी ७.१५ या दरम्यान सुरू आहे. पावसाळ्यानंतर भाऊ चा धक्का ते मोरा (उरण) या दरम्यान ही सेवा सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. हा प्रवास ५५ मिनिटांचा असून या मार्गावर दर महिन्याला ३२ ते ३५ हजार प्रवासी प्रवास करतात. या मार्गावरील प्रवासी संख्येत गेल्या पाच वर्षांत २५ टक्के वाढ झाल्याचे बामणे यांनी सांगितले.सुरक्षेसाठी १४०लाइफ जॅकेट, तराफेदोन्ही मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक लाँचमध्ये ८० ते १४० लाइफ जॅकेट आणि ४ ते ८ तराफे ठेवण्यात आले आहेत.आपत्कालीनस्थितीसाठी चार लाँचेसमुंबई-रायगड दरम्यानची प्रवासी जलसेवा कायम निर्धोक व सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबई जलवाहतूक व औद्योगिक सहकारी संस्थेमार्फत ३ ते ४ लाँचेस निराळ्या उपलब्ध (स्टॅण्डबाय) ठेवल्या जातात. याद्वारे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येते.

टॅग्स :RaigadरायगडGaneshotsavगणेशोत्सव