शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमधील ब्रिटिशकालीन शासकीय इमारती धूळ खात

By admin | Updated: February 22, 2017 06:39 IST

ऐतिहासिक वारसा लाभलेले अन् ब्रिटिश राजवटीत उदयास आलेल्या माथेरान या पर्यटनस्थळांकरिता त्या वेळेस ब्रिटिशांनी

माथेरान : ऐतिहासिक वारसा लाभलेले अन् ब्रिटिश राजवटीत उदयास आलेल्या माथेरान या पर्यटनस्थळांकरिता त्या वेळेस ब्रिटिशांनी उभारलेल्या अनेक शतकी पार केलेल्या हेरिटेज वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत; परंतु यातील काही इमारतींच्या देखभालीकडे संबंधित खात्यांनी पूर्णत: दुर्लक्ष केल्यामुळे त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे सर्वच स्तरांतून नाराजीचे सूर उमटत आहेत. तर या इमारतींकडे संबंधितांनी लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरत आहे.१८५०मध्ये ठाण्याचे कलेक्टर ह्युज मॅलेट यांनी माथेरानला प्रकाशझोतात आणल्यावर येथे ब्रिटिश काळातच धार्मिक स्थळे, शासकीय इमारती उभ्या केल्या होत्या. यांचा वापर शासकीय अधिकारी वर्गाला होत असे. यातील अधीक्षक कॉटेज, वैद्यकीय अधिकारी, वनक्षेत्रपाल, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागासाठी प्रशस्त खोल्याही बांधल्या होत्या; परंतु मागील दोन दशकांपासून यातील काही खोल्यांचा वापर केला जात नसल्याने त्या अत्यंत जीर्ण अन् मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे ही जागा मद्यपींचा अड्डा, तसेच गुरे उभी राहात आहेत. तर कुणी आपल्या हातरिक्षाही या खोल्यांच्या आडोशाला ठेवत आहेत, त्यामुळे हा परिसर बकाल बनला आहे. अधीक्षकांना राहाण्यास स्वतंत्र खोली नसल्याने त्यांना येथे नियमितपणे ये-जा करणे शक्य होत नाही. तसेच याचा नाहक त्रास स्थानिकांना होत आहे. यासाठी संबंधित खात्याने आपापल्या अखत्यारीत असणाऱ्या वास्तूंची योग्य जोपासना करावी, अशी माथेरानकरांकडून मागणी होत आहे. (वार्ताहर)