शहरं
Join us  
Trending Stories
1
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
2
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
3
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
4
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
5
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
6
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
7
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
8
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
9
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
10
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
11
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
12
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
13
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
14
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
16
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
17
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
18
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
19
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
20
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य

घारापुरी-राजबंदरदरम्यान धोकादायक जेट्टीला टेकू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:09 IST

तात्पुरती मलमपट्टी : मेरिटाइम बोर्डाच्या अभियंत्यांकडून पाहणी

मधुकर ठाकूर 

उरण : मुंबई मेरिटाइम बोर्डाच्या दुर्लक्षामुळे शनिवारी कोसळलेल्या घारापुरी-राजबंदर जेट्टीच्या स्लॅबला खालून तात्पुरता उपाय म्हणून टेकू देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजनेमुळे महाशिवरात्रीनिमित्ताने घारापुरी बेटावर येणाऱ्या हजारो शिवभक्तांची मोठी गैरसोय दूर होईल, असा दावा साहाय्यक अभियंते पी. एल. बागुल यांनी पाहणीनंतर केला आहे.

उरण, न्हावा समुद्रमार्गे घारापुरी लेणी पाहायला येणाºया पर्यटक आणि नागरिकांसाठी एकमेव ५० वर्षे जुनी असलेल्या राजबंदर जेट्टीचा स्लॅब आणि जेट्टीखालील अनेक ठिकाणचे प्लास्टर शनिवारपासून कोसळण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे धोकादायक ठरू लागलेल्या जेट्टीमुळे महाशिवरात्रीनिमित्ताने मोठ्या संख्येने येणाºया पर्यटक आणि नागरिकांसाठी ती अत्यंत धोकादायक बनली आहे. धोकादायक ठरूपाहणाºया जेट्टीच्या दुरुस्तीकडे मुंबई मेरिटाइम बोर्डाचे दुर्लक्ष झाल्यामुळे महाशिवरात्रीनिमित्ताने येणाºया हजारो शिवभक्तांची मोठी गैरसोय होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्ताने सुमारे ७०-८० हजार शिवभक्त बेटावर येतात. याच राजबंदर जेट्टीवरून भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळते.घारापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी याआधीच दुरुस्तीअभावी पर्यटक आणि नागरिकांसाठी धोकादायक बनलेल्या जेट्टीची माहिती मुंबई मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने शनिवारी घारापुरी-राजबंदर जेट्टीचा स्लॅब कोसळला. तसेच प्लास्टरही कोसळण्यास सुरुवात झाली आहे. घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर मुंबई मेरिटाईम बोर्डाचे साहाय्यक अभियंते पी. एल. बागुल यांनी सरपंच बळीराम ठाकूर यांच्या सोबत धोकादायक जेट्टीची पाहणी केली. धोकादायक राजबंदर जेट्टीची विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांना माहिती देण्यात आली आहे. देवरे यांनीही जेट्टी दुरुस्तीच्या कामासाठी अंदाज पत्रक तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महाशिवरात्रीनिमित्ताने बेटावर येणाºया हजारो शिवभक्तांची धोकादायक जेट्टीमुळे गैरसोय होऊ नये यासाठी घारापुरी-राजबंदर जेट्टीच्या स्लॅबला खालून तात्पुरता उपाय म्हणून टेकू देण्याची सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्याची माहितीपी. एल. बागुल यांनी दिली. 

टॅग्स :Raigadरायगड