शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील महिसदरा नदीवरील पूल जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:16 IST

कठडे उद्ध्वस्त; प्रवाशांच्या जीवाला धोका

धाटाव : मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग १७ वरील कोलाड पुई येथील महिसदरा नदीवरील पुलाचे कठडे तुटले असून हा पूल पूर्णपणे जीर्ण अवस्थेत असल्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या जड अवजड वाहन चालकांसह प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.या महामार्गावरील कोलाड पुई येथील महिसदरा नदीचा पूल हा ब्रिटिश काळात बांधण्यात आला असुन तो अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे तुटलेले आहेत. यावरून अवजड वाहन गेले तर हा पूल पूर्णपणे हादरला जातो. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. गेल्या सहा ते सात वर्षापासून मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून त्यात म्हणावी तशी प्रगती नाही. तसेच महिसदरा नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामालाही अद्याप सुरुवात नाही.पनवेल ते इंदापूर दरम्यानचे चौपदरीकरणाच्या कामात किमान वर्षातून फक्त २० किलोमीटर अंतराचा रस्ता केला असता तर या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झाले असते. कामाच्या नियोजनाच्या अभावाने व एकंदरीत कामाच्या वेगावरून या रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही.यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून अशा दुर्लक्षामुळे सावित्री नदी पुलासारख्या दुर्घटना घडतात व नंतर कोट्यवधी रु पये खर्च केले जातात, परंतु अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात त्यानंतर शासनाला जाग येते. अशा घटना न घडण्याअगोदर शासनाने उपाययोजना कराव्यात यासाठी लोकप्रतिनिधी व संबंधित व्यक्ती यांनी लक्ष देण्याची गरज आहे, असे नागरिकांचे म्हणणे असून दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे.अपघाताची शक्यतामुंबई-गोवा मार्गावर अनेक पर्यटन स्थळे व कारखाने आहेत यामुळे येथे नेहमी वाहनांची सतत वर्दळ सुरू असते त्यामुळे सतत मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असते. यातून घाईघाईने मार्ग काढताना तुटलेले कठडे लक्षात न आल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.