शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनी ग्रामसभांवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 02:09 IST

राष्ट्रीय सण किंवा उत्सवांवेळी ग्रामसभा न घेता त्या अन्य दिवशी घेण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने केली आहे

पाली : राष्ट्रीय सण किंवा उत्सवांवेळी ग्रामसभा न घेता त्या अन्य दिवशी घेण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने केली आहे. येत्या २६ जानेवारीपासून याची अंमलबजावणी न झाल्यास प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा युनियनचे दिला आहे. त्यानुसार अशा मागणीचे निवेदन सुधागड तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष मयूर कारखानिस व पदाधिकाºयांनी गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे यांना दिले.प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महात्मा गांधी जयंती या दिवशी गावागावांत ग्रामसभांचे आयोजन करण्यात येत असते. मात्र, अशा राष्ट्रीय उत्सवां वेळी सार्वजनिक सुटी असल्याने ग्रामसभेला ग्रामसेवक वगळता इतर संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. त्यातच अशा ग्रामसभां वेळी दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग रजिस्टर फाडणे, हाणामारी, दमदाटी, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, खोटे गुन्हे दाखल करणे, असे प्रकार होत असतात. त्यामुळे अशा राष्ट्रीय उत्सवां वेळी ग्रामसभा न घेता त्या अन्य दिवशी घेण्यात याव्यात. येत्या २६ जानेवारीपासून याची अंमलबजावणी करावी, अन्यथा प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी दिला. ग्रामसभांच्या दिवशी पुरेसे पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्याची मागणीही केली आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात एकनाथ ढाकणे यांनी राष्ट्रीय उत्सवां वेळी ग्रामसभा न घेण्याबाबत ग्रामसेवक युनियनच्या डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या बैठकीत ठराव करण्यात आला आहे. नियमानुसार प्रत्येक आर्थिक वर्षात पहिली ग्रामसभा सुरुवातीच्या दोन महिन्यांच्या आत घेणे बंधनकारक आहे. अर्थात ३० मेपूर्वी पहिली ग्रामसभा घेणे अपेक्षित असून १ मे रोजी म्हणजे महाराष्ट्र दिनी ग्रामसभा घेणे बंधनकारक नाही. याच पद्धतीने दुसरी ग्रामसभा ९ ते १५ आॅगस्ट दरम्यान घेणे अपेक्षित आहे. प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा घेण्याच्या सूचना असल्या तरी या दिवशी सार्वजनिक सुटी असल्याने नियम असूनही ग्रामसभेला इतर शासकीय, निमशासकीय कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे ग्रामसभेचा मूळ उद्देश साध्य होत नसल्याने ग्रामसभा इतर दिवशी आयोजित करण्यात यावी. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिनी फक्त ध्वजारोहणाचे कार्यक्रम घेण्यात यावेत. याबाबत शासनाने योग्य आदेश निर्गमित करावे, अन्यथा येत्या प्रजासत्ताक दिनी ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा ढाकणे यांनी निवेदनात दिला आहे.