शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांसह कुटुंबीयांचा मतदानावर बहिष्कार

By निखिल म्हात्रे | Updated: April 26, 2024 18:40 IST

अनेक आगारांत लावले आंदोलनाचे फलक.

अलिबाग : एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबाबत फक्त आश्वासने देण्यात आली, असा आरोप करून या कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसह लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेचे रायगड अध्यक्ष दिलीप पालवणकर यांनी गुरुवारी संध्याकाळी याबाबत माहिती दिली.

एसटी महामंडळाच्या रायगड विभागात तीन हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. त्यामध्ये दीड हजारांहून अधिक चालक व वाहकांची संख्या आहे. आपत्कालीन परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना सेवा दिली. निवडणुकीच्या काळात कर्मचाऱ्यांसह मतपेट्यांची ने-आण करणे, कोरोना काळात परराज्यांतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या राज्यात सुखरूप पोहोचविण्याचे कामही या कर्मचाऱ्यांनी केले. मात्र, एसटी कर्मचारी शासनाच्या सुविधांपासून वंचित राहिले आहेत.

वेतनवाढीसह सातवा वेतन आयोग मिळावा, यासाठी एसटी कर्मचारी अनेक वर्षांपासून मागणी करीत आहेत. मात्र, सरकारकडून फक्त आश्वासने देण्यात आली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातील होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील फलक अनेक स्थानकांत लावण्यात आले आहेत. ...तर मतदानाचा टक्का घसरणाररायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्ह्यात वेगवेगळ्या यंत्रणेला आवाहन केले आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यास मतदानाचा टक्का घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वेतनवाढीबरोबरच सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी कर्मचारी मागणी करीत आहेत. मात्र, अजूनपर्यंत त्याबाबत कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.- दिलीप पालवणवार, सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटना

टॅग्स :alibaugअलिबाग