शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुलानेच केली आईची गळा दाबून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 05:05 IST

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर व तालुक्यातील कावीर येथील रहिवासी अन्वेय नाईक याने ५ मे रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

अलिबाग : मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर व तालुक्यातील कावीर येथील रहिवासी अन्वेय नाईक याने ५ मे रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या मृत्यूचा धसका घेऊन वयोवृद्ध आईचा मृत्यू झाल्याची शक्यता या वेळी वर्तवण्यात आली होती. मात्र, मुलानेच आपल्या आईला गळा दाबून मारल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात मयत मुलगा अन्वेय नाईक याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अन्वेय मधुकर नाईक (५३) याने आर्थिक विवंचनेतून स्वत: आत्महत्या करून आई कुमुद मधुकर नाईक (७३) हिचा गळा दाबून हत्या केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. त्यांच्या कॉनकॉर्ड या इंटेरियर डिझायनर कंपनीला व्यवसायात नुकसान झाले होते, त्यामुळे कर्जदार त्याच्याकडे पैशांचा तगादा लावत होते. याच तणावात त्याने आपले व आईचे जीवन संपविण्याचे ठरविले.अन्वेय नाईक याने आत्महत्या करण्यापूर्वी रिपब्लिकन टीव्हीचे मालक अर्णब गोस्वामी तर फिरोज शेख व नीतेश सारडा यांनी कामाचे पैसे दिले नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामुळे या तिघांचीही चौकशी पोलिसांमार्फत करण्यात आलीहोती. तर अन्वेय नाईक याची आईही त्याच्या व्यवसायात भागीदारहोती.आईचा मृत्यू मुलाच्या मृत्यूने धसका घेऊन झाला असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या तापसांती व डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार आईचा मृत्यू हा गळा दाबून झाल्याचे समोर आले आहे. अन्वेय यानेच आई कुमुद नाईक हिचा गळा दाबून खून केला व त्यानंतर स्वत: आत्महत्या केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.