शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तळा शहराला दरराेज मिळणार १३५ दशलक्ष लीटर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 01:16 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जलसंपदा विभागाला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्करायगडः तळा शहराला वावे धरणातून १३५ दशलक्ष लीटर पाणी मिळणार असल्याने, येथील पाणीप्रश्न लवकरच सुटणार आहे. तसे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत. गुरुवारी मंत्रालयामध्ये रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन तळा शहराच्या पाणी प्रश्न साेडविण्याबाबतचे निवेदन दिले. त्यानंतर, पवार यांनी जलसंपदा विभागाला निर्देश दिले. त्यामुळे लवकरच तळा शहराचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत हाेणार आहे.तळा तालुका कधीच प्रकाशझाेतात आलेला नाही. सध्या या तालुक्यातही शहरीकरण वाढत आहे. तळा नगरपंचायतीला पाण्याचा प्रश्न भेडसावत हाेता. येथील पाणीप्रश्न साेडवावा, अशी मागणी सातत्याने जाेर धरत हाेती. तळ्याला दैनंदिन सुमारे १३५ दशलक्ष लीटर इतक्या पाण्याची आवश्यकता आहे. त्याबाबतचा प्रस्ताव नगरपंचायतीमार्फत मुख्य अभियंता, कोकण विभाग यांना देण्यात आलेला आहे. तळा नगरपंचायती नजीकच्या तीन किलाेमीटर अंतरावर असलेल्या वावे धरणातील पाण्याचा वापर करून तळा शहरातील जनतेला पिण्यासाठी हा पाणीपुरवठा होऊ शकेल. त्यानुसार, रायगड जिल्ह्यातील वावे धरणातील १३५ दशलक्ष लीटर पिण्याचे पाणी आरक्षित करावे, याबाबत पालकमंत्री , खासदार तटकरे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना विनंती केली.पाणी आरक्षित करावेरायगड जिल्ह्यातील वावे धरणातील १३५ दशलक्ष लीटर पिण्याचे पाणी आरक्षित करावे, याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती केली आहे.