बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी-काळीज या ठिकाणी शनिवार, १३ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घरफोडी करून मोटारसायकल चोरी करणा-या टोळीमधील दोघांना अटक करण्यात आली. महाड एमआयडीसी पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.महाड तालुक्यातील बिरवाडी काळीज-खरवली या ठिकाणी दिनेश धनसिंग आळवा (३०, रा. इंदोर, मध्य प्रदेश) जितेन भलसिंग मनलोई (३०, रा. परेठा) या दोघांनी बिरवाडीमधील विठोबा देऊ सावंत (५८) यांच्या घरी दरोडा टाकून चार हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. तर काळीज येथील सीताराम मोरे कॉम्प्लेक्समधील रंजना सखाराम साळुंखे यांची बंद सदनिका फोडून घरामधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण पाच लाख ४१ हजारांचा ऐवज चोरून नेला तसेच खरवली येथील चंद्रकांत जयवंत पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मोटारसायकल क्रमांक एम एच ०६ बी के ९१४७ ही ५० हजार रुपये किमतीची तसेच मोटारसायकल क्रमांक एम एच ०२ ए आर ७६५३ ही ३० हजार रुपये किमतीची गाडी चोरून नेली म्हणून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला महाड येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .मोटारसायकल चोरी, घरफोडी, दरोडा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाºया टोळीमधील दोन आरोपींना महाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असली तरी अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या आरोपींच्या अटकेमुळे रायगड जिल्ह्यात आणि घरफोड्या, दुचाकी चोºया उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाडमध्ये घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 23:49 IST