शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

बोर्लीपंचतन परिसर ३६ दिवसांपासून अंधारात, महावितरणविरोधात संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 00:49 IST

सद्य:स्थितीत बोर्लीपंचतन, वडवली, दिवेआगर, दिघी, खुजारे अशा चाळीसहून अधिक गाव- खेड्यांत वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थांच्या संतापात वाढ होत आहे.

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरात ३६ दिवस वीजपुरवठा नाही. विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी महावितरणविरोधात थेट पोलीस स्टेशनच गाठले. दिघी सागरी पोलिसांनी मध्यस्थी करीत पोलीस, ग्रामस्थ व महावितरण यांच्यात गुरुवारी सकाळी समन्वय बैठक आयोजित केली होती. या वेळी नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढाच वाचला.सद्य:स्थितीत बोर्लीपंचतन, वडवली, दिवेआगर, दिघी, खुजारे अशा चाळीसहून अधिक गाव- खेड्यांत वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थांच्या संतापात वाढ होत आहे. परिणामी, कुठे अनुचित प्रकार घडू नये. या अनुषंगाने दिघी सागरी पोलीस ठाण्यात तातडीची बैठक बोलावण्यात आली. या वेळी स्थानिक राजकीय नेते मंडळी व इतर ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व प्रमुख ग्रामस्थ यांची सभा घेण्यात आली. या वेळी सर्वांकडून समस्या मांडण्यात आल्या.गावोगावी नेमणूक असलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत नाही. विद्युत खांब उभे करण्यासाठी प्रत्येक गावातून दोनशेहून अधिक ग्रामस्थांचे श्रमदान मिळत असताना अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन होत नाही. म्हसळा, मेंदडी, गोंडघर येथे सबस्टेशन होणारी मुख्य वाहिनीची कामे होत असताना गावा अंतर्गत कामेरखडली आहेत. अनेक विद्युत खांब कोसळलेल्या स्थितीत असून विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत.यामुळे विद्युत पुरवठा स्थिर कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.महावितरणकडून अधिकची बिले आली. ती भरली नाहीत म्हणून वीज जोडणी तोडायला कुणी आले तर आम्ही कर्मचाºयांना ते करू देणार नाही, असा आक्रमक इशारा या वेळी ग्रामस्थांनी दिला.‘आठ दिवसांत वीज येणार’निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. जवळपास सर्वच गावांना या आठ दिवसांत वीज सुरळीत मिळेल, अशी माहिती श्रीवर्धनचे उपअभियंते महेंद्र वाघपैजन यांनी दिली.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरणRaigadरायगड