शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये हाईटगेट हटविण्याच्या मागणीसाठी बोकडवीरा ग्रामस्थांचा सिडकोवर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 17:53 IST

उरण- पनवेल मार्गावरील साकव धोकादायक झाल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे.

उरण :  उरण -पनवेल मार्गावरील हाईटगेट हटविण्याच्या मागणीसाठी बोकडवीरा ग्रामस्थांनी सोमवारी (२८) द्रोणगिरी येथील सिडकोच्या कार्यालयावरच मोर्चा काढण्यात आला होता.

उरण- पनवेल मार्गावरील साकव धोकादायक झाल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. यासाठी फुंडे आणि बोकडवीरा येथे हाईटगेटही उभारण्यात आले आहेत.या दोन्ही हाईटगेटवर वाहने धडकुन अनेक अपघात घडले आहेत.मागील आठवड्यातच फुंडे हायस्कुल जवळच्या हाईटगेटला टेम्पोने धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघाताच्यावेळी टेम्पोच्या मागे असलेल्या दुचाकीवरील  बोकडवीरा गावातील अंकुश पाटील व त्यांची सात वर्षाची मुलगी मनविता यांचा अपघात झाला आहे.

या अपघातात बापलेक दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सिडकोने आर्थिक मदत करावी तसेच अपघातांना जबाबदार असलेले हाईट गेट मोकळे करावेत या दोन प्रमुख मागण्यांसाठी बोकडवीरा ग्रामस्थांनी सोमवारी सिडकोच्या द्रोणगिरी येथील कार्यालयावरच मोर्चा काढण्यात आला होता. या मागण्यांवर सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग,वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांशी सुमारे पाच तास चर्चा केली.सकारात्मक चर्चा होऊन अखेर मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.  

याप्रसंगी सिडकोचे अधिकारी हनुमंत नहाने,एम. एम. मुंढे,नायब तहसीलदार बी. जी. धुमाळ,वाहतूक उपनिरीक्षक संजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नरेश पवार आदी विभागाचे अधिकारी व  बोकडवीरा ग्रामपंचायत सरपंच अपर्णा  पाटील, कामगार नेते भूषण पाटील,विजय पाटील, संतोष पवार यांच्यासह माजी सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :uran-acउरण