शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

250 श्री सदस्य बनले रक्तदाते; डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत रक्तदान शिबीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 19:23 IST

अलिबाग शहराजवळील कुरुळ येथील क्षात्नैक्य माळी समाज सभागृहात सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिराला सुरुवात झाली.

ठळक मुद्देसामाजिक बांधीलकी जपत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडामार्फत आज अलिबागमध्ये रक्तदान शिबीर पार पडले. पहिल्या टप्प्यात 250 रक्ताच्या बॅग जमा करण्यात आल्या आहेत.

- आविष्कार देसाई

अलिबाग : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रायगड जिल्ह्यातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. सामाजिक बांधीलकी जपत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडामार्फत आज अलिबागमध्ये रक्तदान शिबीर पार पडले. पहिल्या टप्प्यात 250 रक्ताच्या बॅग जमा करण्यात आल्या आहेत.

अलिबाग शहराजवळील कुरुळ येथील क्षात्नैक्य माळी समाज सभागृहात सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग येथील जिल्हा रक्तपेढीची रक्त साठविण्याची क्षमता मर्यादित असल्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये 250 बॅग रक्त संकलित करण्यात आल्या.

तसेच गरजेनुसार पुढील टप्प्यात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याचे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.सध्या जगावर कोरोना संकट ओढवले आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे. अलिबाग जिल्हा सरकारी रक्त पेढीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया करणे आवश्यक असलेल्या रुग्णांना रक्ताची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही रुग्णाला रक्ताची कमतरता भासू नये. यासाठी रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान पुढे आले आहे. 

कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करताना सामाजिक अंतर राखणे तसेच सॅनिटायझरचा वापर करुन शिस्तबद्धपणे श्री सदस्यांनी रक्तदान केले. याआधी प्रतिष्ठानमार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील विविध शिबिरांमधून 6 हजार 939 बॅग्ज आणि परदेशातील सिंगापूर येथील शिबिरातून 60 बॅग्ज रक्त संकलित करण्यात आल्या आहेत. 

याआधी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने विविध समाजपयोगी कामे केली आहेत. त्यामध्ये वृक्षलागवड-संगोपन, आपादग्रस्तांना मदत, स्वच्छता अभियान, दाखले वाटप, स्मशानभूमी, दफनभूमीची स्वच्छता, स्मशानभूीचे बांधकाम, जलपुणर्र भरण, श्रवण यंत्र वाटप, आरोग्य शिबीर असे विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत. दरम्यान, अलिबाग येथील रायगड जिल्हा रक्तपेढीचे डॉ. दिपक गोसावी, हेमकांत सोनार, सुनिल बंदीछोडे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांमार्फत रक्त संकलीत करण्यात आले.      

टॅग्स :Raigadरायगड