शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढी सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 02:09 IST

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढी नसल्याने रक्ताची गरज लागल्यास अन्य मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते.

नेरळ : कर्जत उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढी नसल्याने रक्ताची गरज लागल्यास अन्य मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. रक्ताअभावी छोटी मोठी शस्त्रक्रियासुद्धा होऊ शकत नाही. त्यामुळे लवकरच कर्जत उपजिल्हा रुग्णालयात ब्लड बँकेची निर्मिती करण्यात येईल, अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांनी दिली. कर्जत उपजिल्हा रु ग्णालय भेटीप्रसंगी ते बोलत होते.आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांनी गुरु वारी दुपारी कर्जत उपजिल्हा रु ग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांच्या सोबत माजी आमदार देवेंद्र साटम, ठाणे विभागाच्या उपसंचालिका रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई, कर्जत तालुका आरोग्य अधिकारी सी. के. मोरे उपस्थित होते.देशमुख यांनी समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांनी रुग्णालयात भेडसावणाºया समस्यांचा पाढाच वाचला. तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता, अपुरा औषध पुरवठा, डिजटल एक्सरे, सोनोग्राफी मशीनची असुविधा, शवगृहाची दुरवस्था, बंद अवस्थेतील उपकेंद्रे अशा अनेक समस्या भाजपाचे किसान मोर्चाचे नेते सुनील गोगटे, तालुका अध्यक्ष दीपक बेहेरे, आरपीआयचे राहुल डाळिंबकर आदींनी मांडल्या. वैद्यकीय आॅफिसरची पदे भरण्यास प्राधान्य देणार असून या पुढे जिल्हाधिकाºयांना सुद्धा याबाबत विशेष अधिकार देण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. नुकतेच रायगड आणि पालघर मिळून डॉक्टरांची ८९ पदे भरली असून यापैकी रायगड जिल्ह्यातील ४० डॉक्टरांचा समावेश आहे. तसेच यापुढे रुग्णालयाच्या दर्शनी भागात डॉक्टरांची नावे आणि त्यांच्या वेळा दर्शविण्याचे फलक लावणे बंधनकारक केले जाणार आहे. आवश्यकता भासल्यास बीएएमएस डॉक्टरांचीही भरती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडhospitalहॉस्पिटल