शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये भाजपच्या स्वबळावरील निर्णयाचा महायुतीला जाेरदार फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 12:15 IST

 इंडिया आघाडी, भाजपला संमिश्र प्रतिसाद मिळाला. भाजपने अनेक ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढल्याने त्याचा महायुतीला फटका बसल्याचे दिसून आले.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील २१० पैकी ३१ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली होती. अन्य १७९ ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आघाडीवर असून, त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने बाजी मारली आहे.  इंडिया आघाडी, भाजपला संमिश्र प्रतिसाद मिळाला. भाजपने अनेक ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढल्याने त्याचा महायुतीला फटका बसल्याचे दिसून आले.राज्यातील सत्तेत सहभाग असला तरी शिवसेनेचा शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट, भाजप यांनी अनेक ठिकाणी स्वतंत्र, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत दिली. इंडिया आघाडीही काही ठिकाणी आघाडी, तर काही ठिकाणी विरोधात लढाई झाली. मात्र, जिल्ह्यातील मतदारांनी युतीच्या पारड्यात भरघोस मते टाकली. इंडिया आघाडीला संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाड मतदारसंघात शिंदे गटाने वर्चस्व राखल्याचे चित्र आहे. मात्र, श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी, अलिबाग मतदारसंघात शिंदे गटाला फटका बसला आहे. पेण मतदारसंघात भाजपने बाजी मारली असून, ठाकरे गटालाही काही प्रमाणात यश मिळविता आले आहे. मात्र, अनेक ठिकाणी सत्ताधारी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असल्याने त्याचा फायदा हा विरोधकांना मिळाला आहे. जिल्ह्यातील निकालाची आकडेवारीएकूण ग्रामपंचायती     २१०जाहीर निकाल     २१०राष्ट्रवादी (अजित पवार गट) -    ५०शिंदे गट      ६४भाजप      २६उबाठा       २०शेकाप      ३२काँग्रेस     ०३शरद पवार गट      ०३आघाडी व इतर      १२

टॅग्स :Raigadरायगडgram panchayatग्राम पंचायत