शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुरुडमधील बंदला भाजपचा विरोध; नागरिकांना वेठीस धरणाऱ्यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 23:59 IST

पत्रकार परिषद घेऊन नोंदविला आक्षेप

मुरुड : अ‍ॅक्टिव्ह मेंबरच्या नावाने संपूर्ण मुरुड शहर तीन दिवस बंद करून भाजीपाला व मासळीचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शासनाने बंदबाबत कोणतेही आदेश दिले नसताना, समूहाने फिरून दहशत निर्माण करून अ‍ॅक्टिव्ह मेंबर नावाने हा बंद पुकारला. त्यामुळे हा बंद बेकायदा असून, हजारो नागरिकांना वेठीस धरणाऱ्यांचा निषेध भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष महेश मानकर यांनी बंदबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. सोशल मीडिया व शिवसेनेच्या फलकावर तीन दिवसीय बंदचे आव्हान करतेवेळी मनसे व शिवसेनेचा उल्लेख आढळून आला आहे. त्यामुळे हा बंद अ‍ॅक्टिव्ह मेंबरचा नसून या दोन राजकीय पक्षांचा असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला आहे. संचारबंदीमुळे एक तर लोक चार महिने घरात बसून आहेत. लोकांच्या हाताला काम नाही, अशा वेळी बेरोजगारी वाढत असून, बंदमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. सध्या शेतीचा हंगाम सुरू झाला असून, शेतकºयांना शेतीची अवजारे खते व बियाणे विकत घ्यावयाची आहेत, अशा बंदमुळे शेतकरी खूप त्रस्त आहेत.

यावेळी अमीन खानजादा यांनी बंदपेक्षा बाहेरून येणाºया लोकांवर बंदी घाला, म्हणजे रुग्णसंख्या वाढणार नाही, असे सूचित के ले. यावेळी मुरुड शहर अध्यक्ष उमेश माळी यांनी बंदमध्ये मेडिकल व दूध अशा अति आवश्यक सेवा बंद करण्यात आल्या होत्या, त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत, असे सांगितले. यावेळी मुरुड शहर अध्यक्ष उमेश माळी अमीन खानजादा, बाळा गुरव, अभिजित पानवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.सध्या मुरुड शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी बाजारपेठ बंद केल्याने लोकांच्या वर्दळीस प्रतिबंध येतो, याबाबत आम्ही व्यापारी लोकांना भेटून विनंती केली. त्यांना कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत माहिती दिली. आमचे म्हणणे त्यांना पटले व त्यांनी स्वत:हून दुकाने बंद केली आहेत. आम्ही कोणावरही जबरदस्ती अथवा सक्ती केलेली नाही. व्यापाºयांनी सहकार्य केल्यामुळेच आज मुरुडमध्ये बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे. - कुणाल सतविडकर, अ‍ॅक्टिव्ह मेंबर

टॅग्स :BJPभाजपा