शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रायगड, मावळमध्ये भाजपची मोर्चेबांधणी, शिंदे गट म्हणतो युतीधर्मानुसार आम्हीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 09:24 IST

शिवसेनेत दुही निर्माण झाल्याने दोन्ही मतदारसंघात भाजपने लोकसभेची मोर्चेबांधणी सुरू केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: जिल्ह्यात रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघ हे भाजप-शिवसेना युती काळात शिवसेनेकडे होते. मात्र, शिवसेनेत दुही निर्माण झाल्याने दोन्ही मतदारसंघात भाजपने लोकसभेची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर शिंदे आणि ठाकरे गट मात्र, लोकसभा निवडणुकीत आपले मतदारसंघ मित्र पक्षाला सोडणार का, अशी चर्चा सध्या रंगली आहे.

भाजप आणि शिवसेना यांची युती असल्याने २०१४ आणि २०१९ मध्ये रायगड, मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले होते. रायगडमध्ये २०१४ मध्ये युतीचे अनंत गिते हे विजयी झाले होते. तर २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे विजयी झाले होते. मावळ मतदारसंघ दोन्ही वेळेला शिवसेनेने राखला होता. त्यामुळे युतीच्या आघाडी धर्माने दोन्ही मतदारसंघ हे शिवसेनेकडे असायला हवेत. मात्र २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप दोन्ही मतदारसंघांत उमेदवार लढविण्याची तयारी करीत आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप यांची युती संपुष्टात आली. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्र पक्ष एकत्रित येऊन महाविकास आघाडी स्थापन झाली.  तीन पक्षांचे सरकार राज्यात स्थापन झाले. मात्र, सेनेत दुफळी निर्माण होऊन अडीच वर्षाने शिंदे गट व भाजप सत्तेत आले. रायगडचे राजकारणही  बदलले. येथे शिंदे गटाचे तीन व भाजपचे तीन असे बलाबल  आहे. त्यामुळे येथे भाजपची लोकसभेची तयारी सुरू आहे.

शिंदे गटाला अंधारात ठेवून दीड वर्षापासून भाजपची मोर्चे बांधणी सुरू आहे. रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूकप्रमुख म्हणून भाजपने सतीश धारप यांना तर मावळसाठी आ. प्रशांत ठाकूर यांना जबाबदारी दिली आहे,

रायगड आणि मावळ हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. भाजप जरी दोन्ही मतदारसंघात तयारी करीत असले तरी युतीप्रमाणे हे शिवसेनेलाच मिळाले पाहिजे आणि ते आम्हाला मिळतील. काही ठिकाणी अदलाबदल होऊ शकते. वरिष्ठ पातळीवर याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल. - महेंद्र दळवी, शिंदे समर्थक  आमदार, अलिबाग

टॅग्स :RaigadरायगडalibaugअलिबागBJPभाजपा