शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आता भ्रष्टाचारी जनता पक्ष बनलाय, उल्का महाजन यांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 13:54 IST

उरण येथील संविधान आणि लोकशाही विचार मंथ या संघटनेच्या विद्यमाने सोमवंशी क्षत्रिय पाठारे सभागृहात रविवारी आयोजित जाहीर सभेत महाजन बोलत होत्या. 

- मधुकर ठाकूर 

उरण : स्वतःची पार्टी विथ डिफरंस ही ओळख आता भाजपने संपवून टाकली आहे. आता तो म्हणजे  भ्रष्टाचारी जनता पक्ष बनला आहे. लोकांना लाचार बनवायचे आणि आपले इप्सित साध्य करायचे उद्योग त्या पक्षाने आणि नेत्यांनी सुरू केले आहेत, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी केली. उरण येथील संविधान आणि लोकशाही विचार मंथ या संघटनेच्या विद्यमाने सोमवंशी क्षत्रिय पाठारे सभागृहात रविवारी आयोजित जाहीर सभेत महाजन बोलत होत्या. 

वैचारिक क्षेत्रातील कार्यकर्ते या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाजन म्हणाल्या, सरकार इतके निर्दयी बनलंय की सामान्यांना लाचार ठेवण्यात या सरकारला असुरी आनंद आहे. ८० टक्के कुटुंबांना मोफत धान्य देण्याच्या गमजा मारणाऱ्या सरकारला आपला देश गरिबीची रेषा ओलांडतो आहे. याचेही काही पडलेले दिसत नाही. बेरोजगारी रसातळाला पोहचली असताना खोटे आकडे समोर करण्यात सरकार धन्यता मानत आहे. १४१ देशातील बेरोजगारीच्या आकडेवारीत भारताचा क्रमांक १११ वर पोहोचला असल्याचे महाजन म्हणाल्या. 

भूक वाढविणे ही सत्ताधाऱ्यांच्या डिझाईनचा भाग बनला आहे. भूक वाढली की काही सुचत नाही. देशवासीयांना भुकेला ठेवत सरकारने नोटबंदी लादली. मागल्या दाराने जीएसटी लावण्यात आला. एनआरसी लागून लोकांना भयाखाली आणण्यात आले. हे करता करता  शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्यात आले, असे, महाजन म्हणाल्या.

विदर्भ कवी गोविंद पोलाड यांनी आपल्या भाषणात भाजपच्या सरकारला निर्दयी सरकार संबोधलं. रामाच्या नावाने राजकारण करणारा भाजप आणि त्यांचे नेते खरे एक वचनी असतील तर त्यांनी लोकांना १५ लाख रुपये देण्याचा वादा पूर्ण करून दाखवावा असं आव्हान दिले. संसदेचा आणि राष्ट्रपतींचा अवमान करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नापास पंतप्रधान आहेत अशा शब्दात पोलाड यांनी टीकास्त्र सोडले. 

ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचुवार यांनी देशभर लिखाण स्वातंत्र्याच्या होत असलेल्या गळचेपीच्या घटनांचा मागोवा घेताना अशा घटनांचे आकडेच समोर आणले. देशात माध्यमांचे स्वातंत्र्य हे आता नसल्यागत झाल्याचे चुंचुवार म्हणाले. आता विवेकी आवाज संपला तर देशाचे काही खरे नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रवीण पुरो यांनी केले.

टॅग्स :Raigadरायगड