शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बळीराज पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 03:45 IST

रायगड मतदारसंघ : दोन उमेदवारी अर्ज दाखल

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात सोमवारी बळीराज पार्टीचे उमेदवार संजय पाशिलकर आणि बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार नथुराम हाते यांनी आपले उमेदवारी अर्ज रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याकडे दाखल केले आहेत.

बी.कॉम पदवी संपादन केलेले बळीराज पार्टीचे उमेदवार संजय अनंत पाशिलकर हे रोहा तालुक्यातील दुरटोली-जामगाव येथील रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात घोषित केल्यानुसार त्यांची जंगम मालमत्ता १५ लाख ७७ हजार रुपये आहे तर त्यांच्या पत्नी वर्षा संजय पाशिलकर यांची जंगम मालमत्ता ७ लाख ३५ हजार रुपये आहे. संजय पाशिलकर यांची स्थावर मालमत्ता २ कोटी ५२ लाख ९ हजार ६९ रुपयांची तर पत्नी वर्षा पाशिलकर यांची २१ लाख रुपयांची आहे. कोणत्याही स्वरूपाचे फौजदारी गुन्हे त्यांच्यावर दाखल नसून नोकरी व व्यवसाय हे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे.एसएससीपर्यंत शिक्षण झालेले बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार नथुराम भगुराम हाते हे महाड तालुक्यातील वडवली-राजेवाडी येथील रहिवासी असून त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केल्यानुसार त्यांचे उत्पन्नाचे साधन सेवानिवृत्ती वेतन आहे. त्यांच्यावर कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल नाही. त्यांची जंगम मालमत्ता १३ लाख १६ हजार १७८ रुपयांची तर त्यांच्या पत्नी वत्सला नथुराम हाते यांची ५ लाख रुपये मूल्याची आहे. दोन अवलंबितांची प्रत्येकी १ लाख ६५ हजार रुपये मूल्याची जंगम मालमत्ता आहे.स्थावर मालमत्ता ७० लाख रुपयांची आहे. दायित्व रक्कम ८ लाख ४० हजार रुपये आहे. 

टॅग्स :raigad-pcरायगडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक