नेरळ : नेरळ येथील हुतात्मा चौकात स्मारक समितीच्या वतीने २००६ मध्ये स्मारक उभारण्यात आले होते. त्या स्मारकाची नव्याने उभारणी करण्याच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.नेरळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या स्मारकाचे काम केले जाणार असून हुतात्मा भाई कोतवाल, हिराजी पाटील यांचे शिल्प आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प हुतात्मा चौकात उभारण्यात येणार आहे.९ आॅगस्ट २००६मध्ये ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे, एस. एम. देशमुख यांच्या उपस्थितीत स्वातंत्रसैनिक पेंटाणा कोतवाल यांच्या हस्ते हुतात्मा चौकात हुतात्मा स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले होते. कर्जत-कल्याण राज्यमार्गावर माथेरान फाटा तेथे हुतात्मा चौकातील स्मारकाचे पुनर्निर्माण नेरळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. (वार्ताहर)
हुतात्मा स्मारकांच्या पुनर्निर्माणास सुरुवात भूमिपूजन
By admin | Updated: November 13, 2016 01:12 IST