शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 06:56 IST

अलिबाग येथे सहलीसाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली आहे. त्यापैकी दोघांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले असून एकाचा अद्याप शोध लागलेला नाही.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई  - अलिबाग येथे सहलीसाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली आहे. त्यापैकी दोघांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले असून एकाचा अद्याप शोध लागलेला नाही. दरम्यान, रात्री समुद्रात पोहण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न त्यांच्या जिवावर बेतला आहे.कोपरखैरणे परिसरातील २० ते २५ वयोगटातली सुमारे १२ मुले अलिबाग येथे सहलीसाठी गेली होती. त्यापैकी दोघांचा नागाव बीचवर समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. आशिष मिश्रा (२४), सुहाद (फद्दु) सिद्दिकी (२१) अशी समुद्रात बुडालेल्यांची नावे असून, मिश्रा व सिद्दिकी यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला असून, चैतन्य सुळे याचा पोलीस शोध घेत आहेत. आशिष कोपर खैरणे सेक्टर २चा, सुहाद सेक्टर १९ व चैतन्य सेक्टर १४चा राहणारा आहे. सहलीला त्यांच्यासोबत मोहित पुजारी, प्रतीक शेट्टी, अजिंक्य पाटील, प्रज्योत पिंजारी आदींसह कोपरखैरणे परिसरातील इतरही मुले होती. त्यापैकी काही जण फुटबॉल खेळाडू आहेत. सरावाच्या निमित्ताने ते नेहमी एकमेकांच्या संपर्कात असतात. दोन दिवसांपूर्वी त्यांनी अलिबाग येथे सहलीचा बेत आखला. यासाठी काहींनी फुटबॉलचे सामने असल्याचे घरच्यांना सांगितले होते. शिवाय त्यांनी त्यांचा जुना कोच प्रतीक शेट्टी याला सामन्याला जायचे असल्याचे सांगून बेंगलोरवरून बोलावून घेतले होते. त्यानेदेखील रात्रीच्या वेळी समुद्राच्या पाण्यात उतरण्यास सर्वांना विरोध केला. परंतु फक्त ५ मिनिटे आनंद घेतो असे सांगून विरोध डावलून चौघे जण समुद्राच्या पाण्यात उतरले. या वेळी भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे बुडाले तर एक जण सुखरूप बाहेर आला. छातीपेक्षा जास्त खोलीच्या पाण्यात ते उभे असताना पायाखालची वाळू सरकू लागल्याने त्यांना सावरता आले नाही. यामुळे ते लाटेसोबत वाहत गेल्याचा प्रत्यक्षदर्शींचा अंदाजआहे.शनिवारी पहाटेपर्यंत या घटनेची माहिती सहलीला गेलेल्या प्रत्येक मुलाच्या घरापर्यंत पोहोचली होती.रात्री पोहण्याचा मोह ठरला अखेरचानागांव येथे आलेल्या या सहलीतील मुलांना त्यांचे कोच प्रतीक शेट्टी यांनी रात्रीच्या वेळी समुद्रात उतरण्यास मनाई केली होती. परंतू ५ मिनिटे आनंद घेत असे सांगून चौघेजण पाण्यामध्ये उतरले. भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने लाटेसोबत तिघे वाहत गेले.

टॅग्स :Deathमृत्यूRaigadरायगड