अलिबाग : राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ५६व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचा भाग म्हणून प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांचा महोत्सव आणि राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या नाटकांचा पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार १९ व रविवार २0 आॅगस्ट २०१७ रोजी अलिबागेत नव्यानेच नाट्यरसिकांच्या सेवेत रुजू झालेल्या पीएनपी नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही दिवसांच्या सोहळ्याकरिता नाट्यरसिकांना मोफत प्रवेश राहणार आहे. अलिबागकर नाट्यरसिकांनी या नाट्यपर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अलिबागचे नगराध्यक्ष आणि पीएनपी नाट्यगृहाचे संचालक प्रशांत नाईक यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केलेआहे.राज्यनाट्य स्पर्धेने पारंपरिक रूपडं बदलून आमूलाग्र बदल केला आहे. राज्यनाट्य स्पर्धा अधिकाधिक प्रेक्षकाभिमुख व्हावी व अलिबागच्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, याकरिता शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, पीएनपी सहकारी सांस्कृतिक कलाविकास मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील, पीएनपी नाट्यगृहाचे संचालक प्रशांत नाईक यांनी अलिबागमध्ये प्रथमच राज्य नाट्य स्पर्धेतील सर्वोकृष्ट नाटकांचा महोत्सव आयोजन केले असल्याचे या वेळी सोहळ््याचे संयोजक यतिन घरत यांनी सांगितले.
अलिबागमध्ये सर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 02:36 IST