शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नवदुर्गांच्या मूर्तींचे रंगकाम वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 04:14 IST

तालुक्यातील कार्यशाळांमध्ये नवरात्रोत्सवाचे काउंटडाउन सुरू झाले आहे. अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाची चाहूल पेण नगरीतील मूर्ती कार्यशाळांमध्ये

दत्ता म्हात्रे 

पेण : तालुक्यातील कार्यशाळांमध्ये नवरात्रोत्सवाचे काउंटडाउन सुरू झाले आहे. अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाची चाहूल पेण नगरीतील मूर्ती कार्यशाळांमध्ये दिसू लागली. विविध कार्यशाळांमध्ये नवदुर्गेच्या ५०० पेक्षा जास्त मूर्ती रंगवून तयार आहेत. सार्वजनिक मंडळांच्या मागणीनुसार या मूर्ती सजवण्यात येत आहेत.

बुधवार, १० ते गुरुवार, १८ आॅक्टोबरपर्यंत नवरात्रीच्या नऊ रंगांचे भक्तिरंग, जागर, भजन, कीर्तन, प्रवचन, विधीयुक्त होम हवन असा शारदीय नवरात्रोत्सव सार्वजनिक मंडपातील गरबा, दांडिया, इव्हेंट साजरे होतील. मात्र, यासाठी लागणाऱ्या नवदुर्गेच्या मूर्तीची मागणी पेणच्या मूर्ती कार्यशाळांमध्ये होत असते. नवरात्रोत्सवाचे आता स्वरूप बदलले आहे. गावोगावी देवदेवतांच्या मंदिरात साजरा होणारा हा उत्सव आता देवीच्या मोठ्या मूर्तींची स्थापना करून, सेलिब्रिटींना आमंत्रित करून इव्हेंट स्वरुपात साजरा होऊ लागला आहे. नवरात्रोत्सव हा शक्तिपीठांचा उत्सव असल्याने युवा-युवती बरोबरीने कुटुंबातील प्रत्येक सदस्य मनमोकळेपणाने यामध्ये नऊ दिवस सहभागी होतो. मग तो उपक्रम धार्मिक कुळाचाराचा असो व मनोरंजनाचा. नवदुर्गाचे प्रत्येक रूप सध्या पेणच्या कार्यशाळेत पहायला मिळते.

अंबिकामाता, सरस्वती माता, महिषासुरमर्दिनी, चंडिका, अष्टभुजा, महालक्ष्मी अशा देवींच्या विविध रूपातील मूर्तींना कार्यशाळांमधून मागणी असते. त्या अनुषंगाने कार्यशाळांमध्ये देवीच्या मूर्तींना पॉलिश, व्हाईटनेस, रंगकाम, कलाकुसर, शाईकाम व डोळ्यांची आखणी याबरोबरने कलात्मक अशा ज्वेलरी, हिरे, मोती या इटिमेशनचा पूर्ण वापर करीत तब्बल ५००० पेक्षा अधिक मूर्ती रंगवून तयार असल्याचे कार्यशाळांतील सूत्रांनी माहिती दिली.सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू असल्याने कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, येत्या नऊ दिवसांत कार्यशाळांमध्ये मोठ्या नवदुर्गेच्या मूर्तींवर रंगकाम पूर्ण करण्याबाबत लगबग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. 

टॅग्स :RaigadरायगडNavratriनवरात्री