शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनानुसार पार पडल्या 'बाटू'च्या परीक्षा; कुलगुरू प्रा. वेदला रामा शास्त्री यांच्या नियोजनाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 23:12 IST

अंतिम वर्षाच्या सर्व रेग्युलर परीक्षा आज संपन्न झालेल्या असून, बॅकलॉग विषयाच्या परीक्षा उद्या सुरू होणार आहेत.

माणगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणरेच्या अंतिम वर्षाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा संपन्न झाल्या. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे हे सर्वच विद्यापीठांसाठी मोठे आव्हान होते. यूजीसीच्या नियमानुसार व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्व विद्यापीठांना या परीक्षा घेणे अनिवार्य होते. बाटूतर्फे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेत उपाययोजनांचा अवलंब करीत परीक्षा नियोजनबद्ध घेण्यात आल्या.

अंतिम वर्षाच्या सर्व रेग्युलर परीक्षा आज संपन्न झालेल्या असून, बॅकलॉग विषयाच्या परीक्षा उद्या सुरू होणार आहेत. विद्यापीठातर्फे मॉडेल प्रश्नसंच निर्माण करून विद्यार्थ्यांना दिले गेले. परीक्षेबाबत अनेक शंका, अनेक अडचणी विद्यार्थ्यांच्या मनात होत्या. आॅनलाइन परीक्षेच्या प्रणालीबाबतीत विद्यार्थ्यांना असलेल्या प्रश्नांचे निरसन आॅनलाइन मीटिंगद्वारे विद्यापीठाने तसेच महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले.

मुख्य परीक्षेपूर्वी अनेक वेळा सराव परीक्षा देण्याची सोय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संपूर्ण आॅनलाइन परीक्षा प्रणाली समजून घेतली; त्यामुळे परीक्षा देताना त्यांना कोणतीही अडचण आली नाही, अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी दिली आहे.विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. वेदला रामा शास्त्री यांनी परीक्षेच्या प्रत्येक बाबीचे नियोजनबद्ध स्वरूप तयार केले. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत यावर त्यांनी भर दिला. विद्यार्थी व पालक यांच्यावर आर्थिक भार पडू नये हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांकडून कोणतेही परीक्षा शुल्क घेण्यात आले नाही. परीक्षेच्या पूर्वतयारीचे अवलोकन करताना तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कुलगुरू, परीक्षा नियंत्रक डॉ. व्ही.एस. साठे व सर्वच संलग्नित महाविद्यालयांतील प्राचार्यांचे, प्राध्यापकांचे कौतुक केले.आॅनलाइन प्रणालीचा योग्य वापरआॅनलाइन परीक्षा आयोजित करण्यात इतर अनेक विद्यापीठांना अडचण येत असताना महाराष्ट्रातील एकमेव तंत्रशास्त्र विद्यापीठ बाटूने आॅनलाइन परीक्षा घेण्याबाबतचे एक उत्कृष्ट उदाहरण सादर केलेले आहे. विद्यार्थी, पालक आणि समाजातील इतर घटकांकडून त्याचे कौतुक होत आहे. सुयोग्य नियोजन आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात अडचणी आल्या नाहीत. विद्यार्थ्यांच्या शंकांचे आधीच निरसन झालेले होते; शिवाय सरावसुद्धा उपयोगी पडला, असे विद्यापीठ कुलगुरू डॉ. वेदला रामा शास्त्री यांनी या वेळी सांगितले.या परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागले नाही. विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन बहुविकल्पीय पर्यवेक्षित परीक्षा पद्धतीचा अवलंब केला गेला. विद्यार्थ्यांना आपल्या घरूनच फोन, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा वापर करून ही परीक्षा देता येईल अशा प्रणालीचा वापर करण्यात आला.

 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी