शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘बाटु’च्या कुलगुरूपदी विलास गायकर कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 00:12 IST

रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (बाटु)चे कुलगुरू डॉ. विलास जी. गायकर यांनी तडकाफडकी राज्यपालांकडे राजीनामा दिला होता.

माणगाव : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (बाटु)चे कुलगुरू डॉ. विलास जी. गायकर यांनी तडकाफडकी राज्यपालांकडे राजीनामा दिला होता. मात्र, तंत्रशिक्षणमंत्री व सचिवांशी झालेल्या बैठकीत त्यांना राजीनामा मागे घेण्यास सांगितले. राज्याचे तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे व तंत्रशिक्षण विभागाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे कारण देत त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात होते. वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले असले, तरी उच्चशिक्षण विभागाच्या कारभाराला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा होती. येत्या मार्च महिन्यात कुलगुरूंचा कार्यकाळ संपणार आहे.कुलगुरूपदी नियुक्ती झाल्यापासून सतत मागणी करूनही एकाही पदाला मंजुरी दिली नाही. ‘बाटु’ हे राज्यातील तंत्रशास्त्र विद्यापीठ बनले असून, राज्यातील विविध भागांतील अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांनी ‘बाटु’ची संलग्नता स्वीकारली.सध्या ‘बाटु’कडे १०८ महाविद्यालये संलग्न आहेत. मात्र, या महाविद्यालयांना सुविधा देण्यासाठी आवश्यक असलेले विभागीय केंद्र, उपकेंद्रांची स्थापना केली नाही. एकाही ठिकाणी जागा मिळालेली नाही. यातच कुलसचिव असलेले डॉ. सुनील भांबरे यांची नियुक्ती पेणच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयत झाली. तेव्हा डॉ. भांबरे यांच्याकडे प्राचार्य आणि कुलसचिवपदाची जबाबदारी ठेवण्याची विनंती कुलगुरू डॉ. गायकर यांनी उच्चशिक्षण विभागाला केली. मात्र, ही विनंती धुडकावून लावण्यात आली. यामुळे निराश झालेल्या कुलगुरूंनी थेट राजीनामाच दिला होता. ‘बाटु’ विद्यापीठ नवीन असून, विविध पदांना मंजुरी देण्याची घोषणा उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती; परंतु विद्यमान स्थितीत एकही अधिकारी पूर्णवेळ नाही. मुळात विद्यापीठातच अनेक पदे रिक्त असून, नव्याने स्थापन झालेल्या तंत्रशास्त्र विद्यापीठातही पदभरती झाली नाही..वैयक्तिक कारणाने आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले असले, तरी उच्चशिक्षण विभागाच्या कारभाराला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा होती. सध्या ‘बाटु’कडे १०८ महाविद्यालये संलग्न आहेत.