अलिबाग : तालुक्यातील रेवस येथील शेतकऱ्याकडून विहिरीवर विद्युत मीटर लावण्यासाठी साडेतीन हजार रु पयांची लाच घेणाऱ्या विद्युत वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याला अटक करण्यात आली.बुधवारी रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहाथ पकडल्यानंतर गुरुवारी अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिजित रामचंद्र कोहाड (४२) असे या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. सारळ विभागातील शेतकऱ्याच्या शेतामध्ये विहीर असल्याने या विहिरीच्या माध्यमातून पाणी घेण्यासाठी शेतकऱ्याने कनिष्ठ अभियंता यांच्याकडे विजेच्या मीटरसाठी अर्ज केला होता. परंतु मीटर देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली त्यामुळे शेतकऱ्याने विचारणा केली. त्यावेळी कोहाड याने मीटर देण्यासाठी साडेतीन हजार रु पयांची लाच मागितली. शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्र ार दाखल केली. (प्रतिनिधी)सापळा रचलालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खात्री केल्यावर २७ जुलै रोजी सापळा रचला. साडेतीन हजार रुपयांची लाच घेताना कनिष्ठ अभियंता अभिजित कोहाड याला पकडण्यात आले. उपअधीक्षक विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यास्मीन इनामदार, पो. हवालदार दिपक मोरे, पो. ह. जगदिश बारे यांच्यासह पथकाने कारवाई केली.
लाचखोर कनिष्ठ अभियंत्याला अटक
By admin | Updated: July 29, 2016 02:46 IST