शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रायगडातील एकात्मिक बाल विकास वा-यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 04:24 IST

रायगड जिल्ह्यात कुपोषणाने डोके वर काढले आहे. असे असताना एकात्मिक बाल विकास प्रकल्पाला स्वतंत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी नाही

अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : रायगड जिल्ह्यात कुपोषणाने डोके वर काढले आहे. असे असताना एकात्मिक बाल विकास प्रकल्पाला स्वतंत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी नाही. तो पदभार जिल्हा महिला बालविकास अधिकाºयाकडे तात्पुरता देण्यात आला आहे. इतका मोठा प्रश्न असताना, याकरिता स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यास शासनाकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे याबाबत प्रभावी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता अडचणी येत आहेत.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदिवासीवाड्या-पाडे आहेत. या ठिकाणी शिक्षणाचा अभाव असल्याने किशोर वयात लग्न होतात. तसेच चार ते पाच अपत्य होऊ दिले जात असल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर रोजगाराकरिता आदिवासी कुटुंब बाहेर जात असल्याने कमी वजनाच्या मुलांवर योग्य पद्धतीने उपचार होत नाहीत, त्यामुळे आदिवासीबहूल पट्ट्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण बºयापैकी आहे. कुपोषमुक्तीकरिता प्रशासनाकडून प्रयत्न होत असले तरी ते अपुरे आहेत. कर्जत तालुक्यात मोरेवाडी येथील दीड वर्षांच्या एका कमी वजनाच्या बालिकेचा मृत्यू झाल्यामुळे कुपोषण ही समस्या चव्हाट्यावर आली आहे. कर्जतसह इतर तालुक्यांतही कुपोषित मुले आहेत. त्यापैकी बहुतांशी आदिवासीवाड्या आणि पाड्यांवरील आहेत. प्रत्येक तालुक्यात एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत कुपोषणमुक्तीबरोबरच अंगणवाड्या आणि इतर कामे केली जातात. गरोदर मातांची काळजी घेण्यापासून कमी वजनाच्या बालकांच्या वजनवाढीकरिता प्रयत्न करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.जिल्ह्याची जबाबदारी सांभाळण्याकरिता उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे पद जिल्हा परिषदेत आहे; परंतु गेल्या काही महिन्यांपासून हे पद रिक्त आहे. हा पदभार जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे. वास्तविक पाहता, गायकवाड यांची मुख्य नियुक्ती असलेल्या विभागाकडे कामे जास्त आहेत. त्या ठिकाणचा उरक होत नाही, असे असताना गायकवाड त्यांच्यावर जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे काही प्रमाणात अंगणवाड्या, कुपोषण निर्मूलनाकडे त्यांना लक्ष देता येत नाही.तालुक्यात आता नव्याने बाल विकास प्रकल्प अधिकारी रुजू झाले आहेत.