शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजुरांची मजुरी वाढल्याने बळीराजाची होतेय दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 00:40 IST

शेतात कामाची लगबग; रायगडमध्ये यंत्रशेतीचा वापर अशक्य 

लोकमत न्यूज नेटवर्क रायगड :  जिल्ह्यातील बहुतांश शेतामध्ये खरीप हंगमाची लागवड सुरू आहे. कामांसाठी शेतकऱ्यांची लगबग असल्याचे दिसून येते. शेतमजुरांची मजुरी वाढल्याने मजुरांची शाेधाशाेध करताना शेतकऱ्यांची दमछाक हाेत आहे.    रब्बीचा हंगाम संपून आता शेतांमध्ये खरीपाची तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने वाल, हरभरा, मुग, तूर, वाल-पापडी, कांदे, ताेंडली, टोमॅटाे, वांगी, काेबी, फ्लॉवर, मिरची यासह अन्य पिके घेतली जातात. शेतकऱ्यांकडे असलेल्या शेतीचे क्षेत्र खूपच लहान असल्याने या ठिकाणी माेठ्या प्रमाणात शेतीयंत्राचा वापर केला जात नाही. मात्र काही ठिकाणी नांगरणीची कामे ट्रॅक्टरद्वारे करण्यात येतात. शेतीचा व्यवसाय सध्या आतबट्ट्याचा झाला आहे. शेतात राबणाऱ्या मजुरांसाठी सध्या मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक हाेताना दिसते. नवीन पिढीतील तरुण अशा कामांकडे वळत नसल्याने मजुरांची संख्या राेडावली आहे. जे मजुर उपलब्ध हाेतात त्यांनी मजुरी वाढवली आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

शेती करणे आता आतबट्ट्याचा व्यवसायशेतामध्ये राबणाऱ्या मजुरांची कमतरता आहे. जे मजूर येतात त्यांच्या खाण्या-पिण्याची साेय करावी लागते. जुरीही वाढली आहे. त्यामुळे शेती करणे आता आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे. फक्त कुटुंबासाठी लागणाऱ्या धान्यासाठी आता शेतीचा हाेत आहे, असे खंडाळे शेतकरी नंदू साेडवे यांनी सांगितले.शेतीचे क्षेत्र छाेटे आहे, त्यामुळे यांत्रिक पध्दतीने शेती करण्याचा प्रश्नच येत नाही. काही ठिकाणी नांगरणीसाठी ट्रॅक्टर आणण्यात येताे. उर्वरित शेतीची कामे मजुरांच्या जीवावरच करावी लागतात. मजुरीमध्ये चांगलीच वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतीचा व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्न पडताे, असे उमटेचे शेतकरी अनंत पुनर म्हणाले.शेती व्यवसाय करायचा का नाही असा प्रश्न आहे. सतत वाढणाऱ्या खतांच्या किंमती, महाग झालेले बियाणे, वाढत्या मजुरीचा दर यामुळे मेटाकुटीला आलाे आहाेत. पूर्वी एकमेकांच्या शेतात राबण्याची परंपरा हाेती, आता ती लाेप पावली आहे. मजूर मिळत नाही. त्यांची शाेधाशाेध करावी लागते. महागाईच्या काळात आर्थिक घडी विस्कटून जाते, असे सातघर येथील शेतकरी सचिन ठाकूर यांनी सांगितले.

कृषियंत्रांनी मजुरांची जागा घेतलेली नाहीजिल्ह्यातील प्रत्येकाच्या वाट्याला आलेले शेतीचे क्षेत्र हे छाेट्या प्रमाणात आहे. त्यामुळे कृषियंत्राचा वापर आजही अतिशय कमी प्रमाणात हाेताे. शिवाय शेतीचे ठिकाण हे बांधा-बांधाला लागूनच असल्याने त्या ठिकाणी ट्रॅक्टर पाेचणे कठीण आहे. मजुरांच्या मदतीनेच शेतीच्या मशागतीची कामे करण्यात येतात.