शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

गडचिंचले साधू हत्याकांडप्रकरणी 54 आरोपींना जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 05:53 IST

उर्वरित लोकांच्या जामिनासाठी ५ डिसेंबर रोजी होणार सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्ककासा : डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे चोर समजून आठ महिन्यांपूर्वी दोन साधू व चालक यांची जमावाने हत्या केली होती. या प्रकरणात एकूण ५४ आरोपींचा गुरुवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला, तर अटक करण्यात आलेल्यांपैकी उर्वरित लोकांच्या अर्जावर जामिनासाठी ५ डिसेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात जमावातर्फे गैरसमजातून तिघांची हत्या करण्यात आली होती. दोन साधू आणि त्यांचा ड्रायव्हर हे गुजरातमधील सुरत येथील आपल्या गुरूच्या अंत्यदर्शनासाठी जात होते. रात्रीच्या वेळी प्रवास करीत असताना ग्रामस्थांनी संशयातून या तिघांची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात हत्येत सामील असल्याचे दाखवून जवळपास दोनशेहून अधिक जणांवर संशयित म्हणून कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी काही जणांची न्यायालयाने याआधी जामिनावर सुटका केली आहे. गुरुवारी संध्याकाळी पालघरचे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.पी. जाधव यांनी ५४ आरोपींची १५-१५ हजारांच्या जामिनावर सुटका केली आहे.

या प्रकरणात आरोपींतर्फे वकील अमृत अधिकारी आणि अतुल पाटील यांनी बाजू मांडताना म्हटले की, या आरोपींची सदर घटनेत कोणतीच भूमिका नव्हती. त्यांना फक्त संशयाच्या धाग्यावर अटक केली होती. या वेळी मयत साधूंच्या कुटुंबीयांच्या बाजूने वकील पी.एन. ओझा यांनी बाजू मांडली, तर या घटनेतील अन्य आरोपींच्या जामीनअर्जाबाबत येत्या ५ डिसेंबर रोजी निकाल देण्यात येईल, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.  गडचिंचले येथे चोर समजून १६ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. दोन साधू कल्पवृक्षगिरी महाराज, सुशीलगिरी महाराज व त्यांचा चालक नीलेश तेलवडे यांची रात्री जमावाने हत्या केली होती. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी  ठपका ठेवून कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव काळे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे आणि हवालदार नरेश धोंडी यांना सेवेतून सक्तीची सेवानिवृत्त घेण्याची आणि इतर १५ पोलीस कर्मचारी यांना काही वर्षे मूळ वेतनावर ठेवण्याची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र नवी मुंबई यांनी केली होती.  उर्वरित लोकांच्या अर्जावर जामिनासाठी ५ डिसेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

जातीय रंग देण्याचाही प्रयत्न  गडचिंचले येथे घडलेल्या या हत्याकांडाचे तीव्र पडसाद देशभर उमटले होते. या प्रकरणाला जातीय रंग देण्याचाही प्रयत्न काही लोकांनी केला होता. तसेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचीही मागणी करण्यात आली होती. 

टॅग्स :RaigadरायगडCrime Newsगुन्हेगारी